दिक्षा पाटील विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.7378975885

जळगाव:- जिल्हयांत घरफोडी , दुकान फोडीचे व अॅल्युमिनियम तार चोरीच्या गुन्हयांत वाढ झाल्याने मा . एम . राज कुमार सो . पोलीस अधीक्षक सो . जळगाव व मा . श्री . चंद्रकांत गवळी , अपर पोलीस अधीक्षक , जळगाव यांनी श्री . किसन नजनपाटील , वरिष्ठ पोलीस निरीक्षक , स्थानिक गुन्हे शाखा , जळगाव यांना त्याप्रमाणे सुचना व मार्गदर्शन केले . श्री . किसन नजनपाटील , वरिष्ठ पोलीस निरीक्षक , स्थानिक गुन्हे शाखा , जळगाव यांना दि . २४ / ११ / २०२ ९ रोजी गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळाली की , भुसावळ शहरात राहणारे १ ) शेख शकिल शेख सलीम रा . पंचशिल नगर , भुसावळ व २ ) शेख आसिफ शेख अकबर रा . मुस्लीम कॉलनी , खडका रोड , भुसावळ यांनी यावल पोलीस स्टेशन हद्दीत घरफोडी केल्याची खात्री लायक बातमी मिळाली आहे . तरी आपण भुसावळ शहरात वरील इसमांचा शोध घेवून ते मिळून आल्यास त्यांचे कडेस घरफोडी चोरीच्या गुन्हयांबाबत विचारपुस करुन त्यांनी घरफोडी चोरीचे गुन्हे केले असल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी पोउनि . श्री . अमोल देवढे पोहेकों / सुनिल पंडीत दामोदरे , अशरफ शेख निजामोद्दीन , दिपक शांताराम पाटील , लक्ष्मण अरुण पाटील , पोना / किशोर ममराज राठोड , रणजित अशोक जाधव , श्रीकृष्ण खंडेराव देशमुख , पोकों / विनोद सुभाष पाटील , ईश्वर पंडीत पाटील , चापोकों / मुरलीधर सखाराम बारी सर्व नेम स्थानिक गुन्हे शाखा , जळगाव यांचे पथक तयार करुन त्यांना भुसावळ येथे रवाना केले असता वरील पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी वरील संशयीत यांचा भुसावळ शहरता शोध घेतला असता ते भुसावळ शहरात बस स्टॅण्ड जवळील पोलीस चौकी जवळ रिक्षा स्टॉप जवळ १ ) शेख शकिल शेख सलीम वय २६ रा . पंचशिल नगर , भुसावळ व २ ) शेख आसिफ शेख अकबर वय ३२ रा . मुस्लीम कॉलनी , खडका रोड , भुसावळ हे मिळून आले असता त्यांना विचारपुस केली असता त्यांनी १ ) यावल पो.स्टे . ला CCTNS नं . ४४ ९ / २०२२ भादंवि क ४५४,४५७,३८० , ( २ ) पहूर पो.स्टे . CCTNS नं . ३६४ / २०२२ भादंवि क .३८०,४६१ , ( ३ ) एमआयडीसी पो.स्टे . CCTNS नं . ७३४ / २०२१ भादंवि क .३७ ९ हे गुन्हे केल्याची कबुली दिलेली असून सदर गुन्हे करतांना त्यांचे सोबत त्यांचे साथीदार ३ ) वसिम अहमद पिंजारी रा . पंचशिल नगर , भुसावळ ४ ) चॅम्पीयन श्याम इंगळे रा . पंचशिल नगर , भुसावळ , ५ ) श्याम सुभाष शिरसाट ऊर्फ अब्दुल गफ्फुर रा . पापा नगर , भुसावळ , ६ ) आवेश अहमद पिंजारी रा . पंचशिल नगर , भुसावळ हे सुध्दा असल्याचे त्यांनी कबुल केले आहे . आरोपी १ ) शेख शकिल शेख सलीम वय २६ रा . पंचशिल नगर , भुसावळ व २ ) शेख आसिफ शेख अकबर वय ३२ रा . मुस्लीम कॉलनी , खडका रोड , भुसावळ यांना यावल पो.स्टे . CCTNS नं . ४४ ९ / २०२२ भादंवि क .४५४ , ४५७,३८० या गुन्हयांचे पुढील तपास कामी ताब्यात देण्यात आलेले आहे . अशा प्रकारे वरील पथकाने वरील संशयीतांना कडून ०३ गुन्हे उघडकिस आणून चांगली कामगिरी केलेली आहे . तसेच इतर निष्पन्न आरोपी मिळाल्यावर त्यांचे कडून अजुन बरेच घरफोडी व दुकान फोडीचे गुन्हे उघडकिस येण्याची शक्यता आहे .