सिद्धार्थ डोंगरे विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.9921927894

नागपूर : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी चालविण्यात येणारी शासकीय वसतिगृहाची चालू शैक्षणिक प्रवेश प्रक्रीया पूर्ण करण्यात आली असून पहिल्या व दुसऱ्या प्रवेश निवड यादी व्यतिरिक्त रिक्त जागेवर स्पॉट ॲडमिशनची अंतिम मुदत 15 डिसेंबर आहे.
ज्या मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील रिक्त जागेसाठी वसतिगृह प्रवेश अर्ज केलेला आहे, परंतु त्यांचा प्रवेश वसतिगृहात झालेला नाही. त्यांनी स्पॉट ॲडमिशनसाठी 15 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता कार्यालय-सहाय्यक आयुक्त समाजकल्याण, सामाजिक कल्याण, सामाजिक न्याय भवन श्रध्दानंदपेठ, नागपूर येथे आवश्यक कागदपत्रासह हजर रहावे.
विद्यार्थी निर्धारित तारखेस हजर न झाल्यास त्यांचा प्रवेश निश्चित केला जाणार नाही व त्याची जबाबदारी विद्याथ्या्रंची राहील, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, रहाटे कॉलनी वर्धा रोड, नागपूर येथे संपर्क साधावा.