Ticker

6/recent/ticker-posts

इस्रो हेरगिरी प्रकरणातील ४ आरोपींना जामीन देण्याचा केरळ उच्च न्यायालयाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाद्वारे रद्द

रुपाली मेश्राम कार्य.संपादिका चित्रा न्युज मो.९५५२०७३५१५


दिल्ली :-१९९४ च्या इस्रो हेरगिरी प्रकरणात शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांच्या कथित फसवणूक प्रकरणामध्ये माजी पोलिस महासंचालक यांच्यासह चार आरोपींना जामीन देण्याचा केरळ उच्च न्यायालयाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज रद्द केला.

न्यायमूर्ती एम आर शाह आणि न्यायमूर्ती सी टी रविकुमार यांच्या खंडपीठानं वैयक्तिकरित्या आरोपींच्या अटकपूर्व जामीन अर्जावर नव्याने विचार करण्यासाठी हे प्रकरण केरळ उच्च न्यायालयात परत पाठवलं आहे. या प्रकरणी केरळ उच्च न्यायालयानं २०२१ मध्ये आदेश जारी केला होता. चारही आरोपींना पाच आठवडे अटक करू नये, असे निर्देशही खंडपीठाने सीबीआयला दिले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या