Ticker

6/recent/ticker-posts

विद्यार्थ्यांनी तंत्र कौशल्याचा योग्य वापर करावा - डोर्लीकर

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324

भंडारा :-लाखनी येथील जिल्हा परिषद गांधी विद्यालय तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात शिक्षणाधिकारी माध्यमिक डोर्लीकर यांनी लॅड अ हॅण्ड इंडिया मार्फत इयत्ता ११वी च्या विद्यार्थ्यांना हेल्थ केअर आणि इलेक्ट्रॉनिक्स टब चे वितरण प्रसंगी विद्यार्थ्यांनी जीवनामध्ये तंत्र कौशल्याचा योग्य वापर करावा. असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले. यावेळी मुख्याध्यापक रवी मेश्राम, लॅड अ हॅण्ड इंडिया ह्या एनजीओ चे शाहिद अली, टॅबलेट कौशल्याचे क्रितीका मॅडम उपस्थित होते. या प्रसंगी मुख्याध्यापक रवी मेश्राम यांनी विद्यार्थ्यांना उज्वल भविष्य निर्माण करतांना सुरुवात ही शालेय जीवनापासून होत असते. त्यात कौशल्य विकास महत्त्वाचा घटक आहे. असे सांगितले. हे टॅब सर्व मंगल फॅमिली ट्रस्ट द्वारे त्यांचे कौशल्य वाढविण्यासाठी वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या आयोजक मेघा बावणे(हेल्थ केअर) आणि रजत गायधनी(इलेक्ट्रॉनिक्स) हे होते. या कार्यक्रमास जिल्हा परिषद गांधी विद्यालयातील सर्व शिक्षकवृंद, शिक्षिकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी प्रामुख्याने उपस्थित होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या