Ticker

6/recent/ticker-posts

बंद कमरेमे बैठक ,हे कसले नियोजन?



    जळगाव महापालिका आयुक्त यांचेबाबत आमदार सुरेश भोळे यांनी विधानसभेत तक्रार मांडली.म्हणे, आयुक्त माझे ऐकत नाहीत.आमच्या कामांना एनओसी देत नाहीत.आणि इकडे जळगाव ला भाजपचे नगरसेवक उपोषणाला बसले.म्हणे , आयुक्त नाकर्ते आहेत.अविश्वास ठराव आणून यांची बदली करा.ही कैफियत आमदार भोळेंचे गुरू गिरीश महाजन यांचेकडे पोहचली.अर्थात त्यांनीच हा कार्यक्रम आखला होता.तर मग,त्यावर फिनिशिंग करणे आवश्यक होते.
      महाजन,मामा यांनी आयुक्तांना घेऊन चर्चा करायचे ठरवले.ही बैठक जळगाव च्या विकासासाठी नाहीच.ही आहे निधीची वाटणी,लाटणी आणि लुटणीची.तर मग, गुलाबराव पाटील पाहिजेच.गुरू महाजन यांचे शिष्य मंगेश चव्हाण तर सोबत पाहिजेच.नाहीतर गुलाबराव ऐकणार नाहीत.म्हणून एकसे दो भला.एक गुरू,दो चेला.म्हणून त्यांना ही बोलवले.अशी चार आमदारांनी आयुक्तांना घेऊन अजिंठा रेस्ट हाऊस वर बंद दरवाजा आड बैठक घेतली.
    नागरिकांनो,जो कोणी दाणापाणी,अन्नपाणी,भेळ मिसळ, पाणी पुरी खात असेल ,आगदी बिनपाण्याची पीत असेल तरीही त्याला इतके तर नक्कीच कळले असेल कि,हा चोरीचा मामला आहे.म्हणून गुपचूप चा घपला आहे.अजून तरी या चारही आमदारांनी ,जे जळगाव च्या कल्याणासाठी आपण निवडून दिले,त्यांनी कोणालाही सांगितले नाही.यावरून कळते कि,हे नागरिकांशी ,मतदारांशी,करदात्यांशी इमानदार आहेत का?
      मागील नऊ वर्षांपासून जळगाव शहराचा सत्यानाश करून ठेवलेला आहे.हे आमदार धड झालेत आणि प्रत्येक रस्त्यावर भगदाड पडले.जळगांवचे शांघाय हॉंगकॉंग करण्याचे प्रलोभन देऊन निवडून आलेले हे आमदार आणि नगरसेवक अजूनही लुटमारीचेच नियोजन करीत आहेत.काल अजिंठा रेस्ट हाऊसमध्ये हेच झाले.पेपरमधे बातमी आली.म्हणे आयुक्तांसह चार आमदारांची बंद खोलीत चर्चा झाली.अरे पण,काय चर्चा झाली?
      जर यापैकी एक जरी आमदार इमानदार असता तर त्यांनी असे बंद खोलीत जळगाव चे नियोजन केले नसते.महाजन, गुलाबराव,आमचे मामा आणि चाळीसगाव चे चव्हाण यापैकी एकानेही सांगितले नाही कि,आंत काय काय ठरले? तर मग,असे काय केले कि,जे आम्हा जनतेला सांगता येणार नाही.सांगायला लाज वाटत असावी.
     जळगाव शहरातील विकासाचे किंवा भकासाचे नियोजन जर असे बंद खोलीत होत असेल, जनतेला विश्वासात न घेता होत असेल तर महाजन , गुलाबराव, भोळे, चव्हाण तुम्ही विश्वासपात्र नाहीत.तुम्ही भरोसेमंद नाहीत.तुम्ही आमदार आहात, मंत्री आहात म्हणून लोक घाबरून बोलत नाहीत.म्हणून तुम्ही जनतेच्या संयमाचा गैरफायदा घेत आहात.पण हे पाप,हे गौडबंगाल आता लपून राहिलेले नाही.तुम्ही बेजबाबदार आहात असे जर कोणी म्हटले तर कोर्टात जाऊन अब्रूच्या बदल्यात पैशांची मागणी करणार.अब्रू विकून पैसाच हवा आहे.माझी अब्रू घेतली तर मला मोबदला द्या. यामुळे तुमची अब्रू पार धुळीस मिळाली आहे.या अब्रूची नुकसानभरपाई आता पुढील महानगरपालिका निवडणुकीत लोक मोजून देणार आहेत.या अब्रूची नुकसानभरपाई पुढील विधानसभा निवडणुकीत मोजून देणार आहेत.
      महाजन,मामा, गुलाबराव , चव्हाण तुम्ही बंद दरवाजा आड चर्चा केली ते जळगाव शहरातील, जिल्ह्यातील लोकांना आवडले नाही.जर विधानसभा कामकाज लाईव्ह टेलीकास्ट होते,लोकसभा कामकाज लाईव्ह टेलीकास्ट होते तर तुम्ही आमदार का लाईव्ह टेलीकास्ट करीत नाहीत? तुम्ही काहीतरी लपवत आहात.हे नक्कीच!जर आमचाच आमदार आमच्यापासून लपवत असेल तर आम्ही तरी का विश्वास ठेवावा?जर आमचाच मंत्री आमच्यापासून लपवत असेल तर आम्ही तरी का विश्वास ठेवावा? गुन्हेगारी टोळ्यांच्या सुध्दा अशाच गुप्त बैठका होतात.तशाच तुम्ही राजकीय टोळ्या करीत आहात.तर मग,तुमच्यात आणि त्यांच्यात फरक काय उरला?

.. शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या