आज एक कळी चेंगरली.आई समोरच .दुखाला पारावर उरला नाही.काल एक तरूण गेला.परवा एक प्रौढ गेला.तेरवा एक वयस्कर गेला.हे अपघाती मरणाचे चक्र थांबत नाही.ज्याचे जाते,त्याचे रडते.इतरांना एका दिवसापुरते वाटते.उलट अंत्यविधी ला जाऊन दुखाचा आवेश आणून भाषण ठोकता येते.पुन्हा नवीन अपघाताची वाट पाहातो.पण लक्षात कोणी घेत नाही कि,ही वेळ माझ्या आप्तेष्टावर सुद्धा येईल.तसा विचार केला असता तर त्या दिशेने पावले टाकली असती.
जळगाव जिल्ह्यातील रेती व्यवसाय हा सोने चांदी, अफू गांजा पेक्षा ही मोठा आहे.यात फक्त रेतीमाफिया नव्हे अधिकारी आणि पुढारी सुद्धा सहभागी आहेत.हे ज्याला कळत नसेल तर त्याने हा लेख वाचून सोडून द्यावा.जनावरासारखे जगून मोकळे व्हावे.आम्ही बोलतो,लिहीतो ते फक्त बुद्धिमान, ज्ञानी, नितीमान, संवेदनशील माणसांसाठीच.
रेती या विषयावर तलाठी, तहसीलदार, कलेक्टर सर्वच अधिकारी दिवसातून बारा तास काम करतात.नियंत्रण ठेवण्यासाठी नव्हे, नियोजन करण्यासाठी.कारण तसे त्यांना टार्गेट दिलेले असते.पालकमंत्री आणि महसूलमंत्री यांनी.इतके कलेक्शन झालेच पाहिजे.नाहीतर तुमची उचलबांगडी करू, तुकाराम मुंढे सारखी.
जळगाव जिल्ह्यातील रेती चोरणारे,वाहाणारे,विकणारे हे तलाठी, तहसीलदार कलेक्टर यांच्या संपर्कात असतात.त्यांचे सरकार मान्य दर ठरलेले असतात.कोणी कितीही तक्रार करा,ते कागद ठेवून घेतात.रद्दी विकून चहा पिण्यासाठी.त्यांचेकडून रीतसर दराने लगान पोहचवली जाते.ती एकत्र करून जिल्ह्यातील सर्वच आमदार, पालकमंत्री ,महसूलमंत्री यांच्याकडे वितरित केली जाते.
यापैकी तलाठी तहसीलदार कलेक्टर तर तुम्ही भरती करीत नाहीत.पालकमंत्री आणि महसूलमंत्री तुमच्या कह्यात नसतो.पण तुमचा आमदार मात्र तुमच्या रेंज मधे असतो.तुमचा नगरसेवक तुमच्या रेंजमधे असतो.तो या लगान चा भागीदार असतो.म्हणून तो कधीच विरोधात जात नाही.आजपर्यंत कोणी ऐकले का? सुरेश भोळे, किशोर पाटील, चिमणराव पाटील, शिरीष चौधरी, संजय सावकारे, गुलाबराव पाटील, गिरीश महाजन,अनिल पाटील, चंद्रकांत पाटील, मंगेश चव्हाण किंवा लता सोनवणे या विरोधात बोलले का?मुळीच नाही.कारण यांची या रेती व्यवसायात सम्मती असते.भागीदारी असते.तेच पैसे तुम्हाला मला मेले त्यांना हे मतांसाठी देतात.हेच पैसे नवरात्र, शिवजयंती, आंबेडकर जयंती ला देणगी देतात.आपण घेतो.त्यांचे फोटो, त्यांचे कौतुक असलेले बैनर लावतो.आपली मुले, पत्नी,आई,बाबा ते पाहातात.पण यांना कळतच नाही कि,आपण यमराजकडून देणगी घेतली.आता हाच यमराजाच्या मतदारसंघात रस्त्यावर रेतीचे ट्रॅक्टर, डंपर सुसाट वेगाने पळतात.आपली, मुलगी,मुलगा, बायको,आई,बाबाचा जीव घेतात.तेंव्हा हाच यमराज आपले सान्त्वन करायला पुढे येतो.तो दोन शब्द बोलला कि आपले दुःख हलके होते.
असे हे दुष्ट चक्र! यात आमचा मृत्यू डंपर, ट्रॅक्टर खाली चिरडून मारणे ठरलेला आहे.जर तुम्हाला आपल्या आप्तांच्या मरणाचे दुःख असेल आणि ईश्वराने दिलेला मेंदू वापरायचा असेल आणि संविधानात दिलेला मताचा अधिकार गाजवायचा असेल तर एकही आमदार रिपीट करू नका.कारण हेच आहेत आपल्या मृत्यूचे सौदागर.
जळगाव जिल्ह्यातील अकरा आमदारांपैकी एकानेही ठरवले कि,मी रेतीचा हप्ता घेणार नाही,माझी माणसे चेंगरून मरू देणार नाही,तर ते सहज शक्य आहे.मजाल नाही महसूलमंत्री कलेक्टर कडून हप्ता मागेल.मजाल नाही कलेक्टर तहसीलदार कडून हप्ता मागेल.मजाल नाही तहसीलदार तलाठी कडून हप्ता मागेल.मजाल नाही तलाठी रेती माफिया कडून हप्ता मागेल.
यातील तलाठी, तहसीलदार कलेक्टर यांना तुम्ही लगाम लावू शकत नाहीत.ती पालकमंत्री आणि महसूलमंत्री ची माणसे आहेत.ती पगारी माणसे आहेत.त्यांना नोकरी करणे मजबुरी आहे.त्यांना मंत्री चा
आदेश पाळणे अनिवार्य आहे.पण तुम्ही तुमचा बेईमान आमदार खणून फेकू शकतात.त्यासाठी कोणताही टिकम,फावडा, जेसीबी,क्रेन ची गरज नाही.फक्त तुमच्या हाताच्या एकाच करंगळीने मताचे बटन दाबण्याची.लोकशाहीत खरी शक्ती मतदारांच्या करंगळीत आहे.
ज्या खात्यातून हप्ता वसुली होते, महसूल, पोलिस, दारूबंदी,आरटीओ, बांधकाम, जलसंपदा,राशन ,शिक्षण , आरोग्य अशा सर्वच उत्पन्नात आपल्या आमदाराला दहा टक्के मिळतात.तेच पैसे तो तुम्हाला निवडणुकीत मताचे देतो.तेच पैसे तुम्हाला नवरात्र उत्सव, शिवजयंती, आंबेडकर जयंती ला देतो.तुम्ही खुष होतात.आपल्याच मरणाचे स्वागत करतात. मी, तुम्ही, आपण मतदारांचे हेच पाप असते.ते एकत्र होऊन मोठे होते.जिवघेणे होते.तेच आपल्या वाटेवर यमराज बनून उभे असते.त्याचा हा परिणाम.ज्याला आम्ही मतदार कारण आहोत.जसा आपल्या सुखाचा उगम आपल्याच हृदयातून होतो.तसाच आपल्या दुखाचा उगम आपल्याच नितीतून होतो.म्हणून आपले रडणे,कण्हणे,कुथणे,हुंदणे व्यर्थ ठरते.
... शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव


0 टिप्पण्या