Ticker

6/recent/ticker-posts

शाहूनगरात वर्षावास निमित्त धम्म प्रवचन कार्यक्रम संपन्न !


🔹 आपण समस्या मुक्त आहात, त्यामुळं बाबासाहेबांच्या आणि रमाईच्या त्यागाला समजून बाबासाहेबांची धम्म चळवळ गतिमान करण्यासाठी पुढे आले पाहिजे.


🔹 आपण धम्मग्रंथासह भारतीय संविधान समजून घेऊन त्यांच्या प्रचार प्रसारासाठी वेळ द्यावा.


मिलिंद गायकवाड उपसंपादक महा, चित्रा न्यूज मो,9860179256


उस्मानाबाद : - दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया च्या वतीने,दि 13/08/2023 वार रविवारी सकाळी ठिक 10.00 वा,बौद्धांच्या विश्वात पवित्र आणि क्रांतिकारी असलेल्या वर्षावासा निमित्त सामूहिक बुद्ध वंदना आणि प्रवचनाच्या कार्यक्रमाचे आयोजन शाहू नगर नालंदा बुद्धविहार येथे करण्यात आले होते.नालंदा बुद्ध विहाराच्या उपासिकांनी महामानवांच्या प्रतिमा पूजन केले आणि गोड सुमधुर आवाजामध्ये सामूहिक पंचशील ग्रहण केले.यावेळी ता.अध्यक्ष बाबासाहेब बनसोडे यांनी प्रास्ताविक केले.तर सौ.काजलताई गायकवाड,भारतीय बौध्द महासभेचे ता.संरक्षण सचिवसचिन दिलपाक यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा भारतीय बौद्ध महासभेचे जि. संघटक विजय बनसोडे यांनी भारतीय संविधानाची अंमलबजावणी का होत नाही आणि तथागतांचा कर्म सिद्धांत या विषयावर उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले.यावेळीसौ.शीला पवार,सौ.संगिता वावळकर,सौ.शोभा चंदनशिवे,सौ. मीरा शिंदे,सौ.संगिता गायकवाड,सौ. वर्षा कांबळे, सौ काजल गायकवाड, सौ.कल्पना कांबळे,सौ.जयश्री चंदनशिवे,सौ लिलाताई चंदनशिवे, सौ आशा हजारे,सौ.अनिता घाडगे,सौ. अनिता ठोकळ,सौ.नंदा कांबळे,सौ सुलेखा घरबुडवे,सौ सोनटक्के ताई, श्रीमती आशा गायकवाड,श्रीमती. पुष्पा सुरवसे,सौ सुनिता सिरसाट,सौ.शहाबाई पालके यांच्या सह रोहित गायकवाड,पवार मारोती सर सर्व बौद्ध उपासक/उपासिका यांची उपस्थिती होती.तर कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितानी अल्प आहार घेतला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या