मनिष मसुरकर उप.संपादक / कार्य. संपादक मध्यप्रदेश/गुजरात चित्रा न्यूज मो. 8879373164
नवी मुंबई : आप नवी मुंबईचे दिघा नोड मधील भावी नगरसेवक आणि युवा अध्यक्ष, संतोषभाऊ केदारे हे, सतत स्थानीय नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर असतात. पण संतोषभाऊ तर्फे, दिघा एच विभाग कार्यालयास, आप चे कार्यकर्ते म्हणून, लोकांच्या समस्या निवेदनाद्वारे प्रशासनाला पोहोचवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न होत असतो. पण सतत नम्र निवेदन देऊन सुध्दा, प्रशासन, आपच्या दिघा टीम कडून निदर्शनास आणून दिलेल्या वास्तविक नागरी समस्यांकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे असे आपच्या निदर्शनास आले. त्यामुळे नाईलाजास्तव सामान्य स्थानिकांच्या जनभावना लक्षात घेऊन, टीम आप दिघा च्या कार्यकर्त्यांना एच विभाग कार्यालयया वर धडक मोर्चा आणि शांतीपूर्ण आंदोलन करावे लागले.
नवी मुंबईच्या दिघा नोड च्या विविध प्रभागांमध्ध्ये, आपल्या हक्क आणीअधिकारा पासुन वंचित असलेला, सामान्यजनांच्या मोठा वर्ग आहे. दिघा टीम तर्फे, सतत उपस्थित केलेल्या काही नागरी समस्या खालील प्रमाणे,
१. दिघा एच विभाग कार्यालया अंतर्गत असलेल्या शाळांची परिस्थितीत अत्यंत गंभीर आहे. व्यावसायिक गाळ्यांमध्ध्ये शाळा भरविल्या जात असून, तेथे पावसाची गळती आणी वायुविजनच्या गंभीर समस्या आहेत. त्याबद्दल प्रशासनाने दखल घेऊन संबंधित अधिकारी यांना शाळेची भौगोलिक परिस्थिती व शैक्षणिक परिस्थितीत दोन्ही चा आढावा घेवुन पालक शिक्षक यांच्या मधे समन्वय साधून शिक्षणाचा दर्जा उंचावण्यास मदत होईल अशी व्यवस्था करावी
२. दिघा विभागातील सार्वजनिक स्वच्छतागृह याची सिवर आऊट लाईन वाॅटर सिवर लाईन मधे जोडण्यात यावे जेणेकरून नागरिकांच्या सामान्य गटर मधे दुर्गंधी पसरून आजार उद्भवणार नाही. तसेच मैदाने आणी रिक्षा स्टॅन्डजवळ सुध्दा नवीन सार्वजनिक स्वच्छतागृहे बनविण्यात यावी
३. दिघा एच विभाग कार्यालया अंतर्गत येणारा परिसर हा चाळीत राहाणारा वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे हे लक्षात घेता दिवाबत्ती ची व्यवस्था नसल्याने अपराध होतात किंवा असामाजीक तत्वांना अपराध करण्यास वाव मिळतो ही बाब लक्षात घेता संपूर्ण दिघा विभागातील चाळीच सर्वेक्षण करून बंद स्वरूपात असलेल्या दिवाबत्ती पुर्ववत करुन व ज्या ठिकाणी नसेल त्या ठिकाणी नवीन पोल ची व्यवस्था तातडीने करावी.
4. दिघा एच विभाग कार्यालया अंतर्गत असणारे विष्णू नगर, रामजी नगर येथील काही भाग हा डोंगरा लगत असल्याने तेथे संरक्षण भिंत उभारणे अत्यंत गरजेचे आहे याचा देखील विचार व्हावा तसेच तेथील सर्वीस रोड करत असताना डोगंराची माती पावसाळ्यात रोडवर येवुन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे तेथे रोडसाईड ब्लाॅक लावणे आवश्यक आहे.
५. आणी सर्वात महत्वाची नागरी समस्या म्हणजे, दिघा एच विभाग कार्यालया मध्दे जेव्हा सामान्य नागरिक जातो, तेव्हा त्याच्या मार्गदर्शनासाठी कुठलेही बोर्ड वगैरे लावलेले नाहीत. तसेच महानगरपालिका नवी मुंबई मार्फत राबवत असलेल्या योजनांचे माहिती फलक दर्शनी भागात लावण्यात आलेले नाहीत.
६. महानगरपालिका दिघा एच विभाग कार्यालया अंतर्गत होनारी कामे, होत असताना त्या ठिकाणी कामाची संपूर्ण माहिती कालावधी, ठेकेदाराचे नाव, कामाचे नाव ,कुठल्या निधीतुन काम होत आहे त्याची मंजुर रक्कम असलेली फलक लावण्यात येत नाहीत.
अश्या ह्या वास्तविक, सामान्यजनांच्या निगडित नागरी समस्यांसाठी, हा धडक मोर्चा आणी शांतीपूर्ण आंदोलन, स्थानिक नागरिकांची आणी विशेषतः महिला वर्गाच्या मोठ्या प्रमाणावर उस्फुर्त उपस्थितीत करण्यात आले.
"नवी मुंबई नगरपालिका निवडणूक हि एप्रिल २०२० पासून प्रलंबित आहे, म्हणजे प्रशासकीय राजवटीचे हे चौथे रेकॉर्ड ब्रेकिंग वर्ष आहे. स्थानिकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींच्या अभावी, प्रशासकीय अधिकाऱ्यांवर वचक नसल्याने, ते जाणूनबुजून वास्तविक नागरी समस्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत. येत्या काळात ह्या समस्यांचे निराकरण न झाल्यास ह्या पेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल - संतोषभाऊ केदारे - युवा अध्यक्ष - आप नवी मुंबई"
"वॉर्ड ऑफिस तसेच IAS दर्जाच्या, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांकडे निवेदन देऊन आणी सतत पाठपुरावा करून सुध्दा वास्तविक नागरी समस्यांचे निराकरण होत नाही, हे योग्य नाही - देवराम सूर्यवंशी, निवृत्त कामगार आयुक्त आणी आप नवी मुंबई ऐरोली विधानसभा अध्यक्ष."
ह्या शिवाय, ह्या मोर्चात आप नवी मुंबईच्या दिघा टीम मधून, सोहेल शेख तुर्भे (वॉर्ड अध्यक्ष ७२ युवा आघाडी), विनोद भाऊ इंगळे, मोहन चोरमले, युवराज खरात, मिलिंद सावंत, मिथुन घंटेवाड ,अरविंद गुप्ता (वॉर्ड अध्यक्ष क्र. ०३), रेश्मा जाधव, सुमन घंटावाड, राणी खरात, चांगुणा मोरे, मीना चौधरी इत्यादी पदाधिकारी आणी कार्यकर्त्यांचा सहभाग होता.


0 टिप्पण्या