Ticker

6/recent/ticker-posts

जळगावात मुख्य रस्त्यावर अतिक्रमण?

जळगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाण, स्टेट बँक ऑफ इंडिया.समोर छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम.रहदारीचा महत्वाचा रस्ता.आणि येथे चालू आहे अतिक्रमण.अतिक्रमण नव्हे आक्रमणच.ते कोणी ऐरागैरा करीत नसून स्टेट बँक ऑफ इंडिया चे मैनेजर.सरकारी अधिकारी.हे सर्रास चुकीचे आहे.
   याच रस्त्याने कलेक्टर,एसपी, आयुक्त, न्यायाधिश ,पोलिस, तहसीलदार , कारकून सिपाई जातो पण यांकडे लक्ष नसेल का?हे लोक सरकार चा पगार घेऊनही परके असल्यासारखे बेजबाबदारपणे कानाडोळा करतात.शहराप्रती उदासिनता असल्याने, वैयक्तिक स्वार्थांध असल्याने ही वृत्ती, प्रवृत्ती बळावली आहे.नोकर तो नोकरच.मग तो कलेक्टर असो की सिपाई.ही नोकर माणसे येतील जातील पण आम्ही जळगाव चे नागरिक ,नगरसेवक, आम्ही जळगाव चे आमदार तर येथेच राहणार आहोत ना!पण यांच्यात ही तितकी संवेदना दिसत नाही.ही माणसे या जळगाव चे जबाबदार नागरिक नसून मेरा भारत महान,वंदे भारत म्हणणारी कलाकार आहेत.
     स्टेट बँक ऑफ इंडिया समोर ही जागा खातेदारांना पार्किंग साठी आहे.तिच अशी अडवून घेतली तर वाहने रस्त्यावर लागतील का?एकीकडे महानगरपालिका अधिकारी अतिक्रमण तोडते किंवा तोडण्याचे नाटक करुन खंडणी वसूल करते आणि दुसरीकडे चक्क मोठ्या रस्त्यावर अतिक्रमण होतांना डोळेझाक करते.हे चुकीचे आहे.बॅंकेने चार फूट जागा अडवली.आता पुढील इमारत मालक चार फूट जागा अडवेल.असे करीत करीत हा रस्ता अरूंद होत जाईल.म्हणून हे आताच थांबवणे आणि तोडणे आवश्यक आहे.

... शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या