Ticker

6/recent/ticker-posts

मेरी माटी मेरा देश अर्थात माझी माती माझा देश उपक्रम जामखेड तालुक्यात उत्साहात साजरा - गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे....

सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं.7058137098

अहमदनगर :- मेरी माटी मेरा देश अर्थात माझी माती माझा देश हा कार्यक्रम १२ ऑगस्ट २० २३  रोजी सकाळी ९ वाजता जामखेड तालुक्यातील सर्व शाळा मध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी दिली .          
माती असलेला कलश व मशालसह प्रभात फेरी काढण्यात आली ,   यावेळी विद्यार्थी यांनी विविध घोषणा दिल्या .शिला फलक उभारण्यात आला ,पंचप्राण ची शपथ घेण्यात आली , वीरांना वंदन करण्यात आले , वसूधा नमन करण्यात आले . शाळेतील विद्यार्थी वेगवेगळ्या सुंदर गणवेशामध्ये फेरीत सहभागी झाले .
        कार्यक्रमामध्ये  विद्यार्थी , शाळा व्यवस्थापन समिती , पालक, ग्रामस्थ , पदाधिकारी , शिक्षक अदि. मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. या सर्वांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या