१२ लाखांच्या १० हजार बादल्या खरंच आणले का.? प्रकरणाला नवा पुरावा, नवे वळण 

संजीव भांबोरे भंडारा 
भंडारा : सध्या साकोली नगरपरिषेकडून "घर कर भरा आणि बादल्या न्या" या प्रकरणावर नगरपरिषद चर्चेत आली आहे. एका जागरूक प्रतिनिधीने मागविलेल्या माहिती अधिकारात घूमजाव केल्याने या प्रकरणाला नाट्यमय वळण मिळाले असून एक नवे प्रकरण प्रसिद्धी माध्यमाच्या हाती नुकतेच हाती लागले आहे. घर टॅक्स भरल्यानंतरही आचार संहिता असल्याचे सांगून बादल्या नाकारण्यात आल्याचे प्रकरण आता नव्याने समोर आले आहे. आचार संहिता लागू झाल्याने आम्ही बदल्या देऊ शकत नाही असे नगरपरिषद प्रशासनाने सांगून घर कर भरणाऱ्या नागरिकाला बादल्या न देता परत पाठविले. त्यामुळे साकोली नगरपरिषद "संशय कल्लोळ" नाट्य प्रयोग सादर करीत असल्याचे दिसून येत आहे. आता नगरपरिषदेने आणलेल्या बादल्या खरंच संपल्यात की १० हजार बादल्या आल्याच नाहीत यावर संशय निर्माण झाला आहे. 
        सेंदूरवाफा येथील प्रेमराव लेखराम बडवाईक यांनी ५ /३/२०२४  रोजी १,५,१३ रुपये घर टॅक्स भरला. त्यानंतर सदर नागरिकाने बादल्याची मागणी केली असता आचार संहिता लागल्याचे सांगून बादल्या न देता परत पाठविण्यात आले.'स्वच्छ - भारत- एक पाऊल पुढे' हे शासकीय अभियान आहे. त्यामुळे बादल्या नाकारण्याचा प्रश्न कसा काय निर्माण होतो. त्यामुळे नगर परिषदेने माहिती अधिकारात दाखविलेल्या १० हजार बादल्या खरंच आल्यात काय.? हा संशय कल्लोळ नाट्यप्रयोग सध्या साकोली जनतेच्या अंतर्मनात घोळत आहे. यापूर्वीच माहिती अधिकार संर्दभात नगर परिषदेचे वृत्त प्रकाशित झाल्याने साकोली नगरपरिषद प्रशासनात खळबळ उडाली आहे. त्यातल्या त्यात माहिती अधिकारात मागितलेल्या माहिती संदर्भात घूमजाव केल्याने हा विषय अधिकच संशयित झाला आहे. साकोली जनतेकडून या साकोली मिडीयाच्या बातमीचे कौतुक करतांना आता नव्याने या बातमीत भर पडली आहे. आता नगर परिषदेने नागरिकांना किती बादल्या दिल्यात आणि बाकी किती आहेत याचा हिशेब द्यावा आणि नगरपरिषद प्रशासनाने सुरू केलेल्या संशय कल्लोळ नाट्य प्रयोगाचा खुलासा करावा अशी मागणी जोर धरत आहे. या प्रकरण संदर्भात काही सामाजिक कार्यकर्ते येत्या एक-दोन दिवसात निवेदन देणार असल्याची माहिती आहे. बादल्याच्या हिशेब द्या अन्यथा परिणामाला सामोरे जा अशी मोहीम जनतेकडून सुरू होणार असल्याची माहिती आहे.,