महाराष्ट्रात महायुतीला 40 आणि एन डी ए ला देशात चारशे पेक्षा जास्त जागा मिळतील
संघदीप मेश्राम चित्रा न्युज
मुंबई - देशभरातील विविध एक्झिट पोल हे राष्ट्रीय लोकशाही आघाडी ( एन डी ए ) ला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचे सांगत एनडीए ला 350 ते 375 जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. एक्झिट पोल च्या अंदाजा पेक्षा एन डी ए ला जास्त जागा मिळतील. महाराष्ट्रात महायुतीला 35 ते 40 जागा मिळतील तर देशात एनडीए चारशे पेक्षा जास्त जागा जिंकण्यात यशस्वी होईल असा मला पूर्ण विश्वास असल्याचे मत आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी व्यक्त केला.
बांद्रा पूर्व येथे त्यांच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ना. रामदास आठवले बोलत होते.
मागील वर्षात 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत राजस्थान मध्ये भाजप चे सरकार येणार आणि मध्य प्रदेश आणि छत्तीसगड मध्ये भाजपला यश मिळणार नाही असा अंदाज एक्झिट पोल ने दिला होता .पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीबाबत एक्झिट पोल चे जे अंदाज होते त्यापेक्षा अधिक मोठे यश भाजप ला मिळाले होते. राजस्थान मध्ये भाजप चे सरकार आले ; मध्य प्रदेशात भाजपने 163 जागा जिंकून बहुमत मिळवून सत्ता स्थापन केली आहे.तर छ्त्तीसगढ मध्ये ही भाजप चे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे एक्झिट पोल पेक्षा अधिक मोठे यश मिळविण्याची भाजप ची परंपरा या लोकसभा निवडणुकीत कायम राहणार असून एक्झिट पोल ने एन डी ए ला दाखवलेले 375 जागांचे यश चांगले असून प्रत्यक्ष निकालात एन डी ए चारशे पेक्षा अधिक जागा जिंकून एक्झिट पोलमध्ये दाखवलेल्या यशापेक्षा मोठे यश एन डी ए ला नक्की मिळेल असा विश्वास ना. रामदास आठवलेंनी आज व्यक्त केला.
काँग्रेस आणि विरोधी पक्षाने दलित जनतेत संविधान बदलाच्या चर्चेतून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला असला तरी आम्ही तो संभ्रम दूर केला आहे.प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी 10 वर्षांतील विकासाचा कार्यक्रम जनतेसमोर मांडला.त्यामुळे जनतेचा कौल एनडीए ला मिळणार आहे.एन डी ए ला चारशे पेक्षा जास्त जागा मिळतील असा मला पूर्ण विश्वास आहे. महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीत कांटे की टक्कर आहे.मात्र हा सामना महायुतीच जिंकणार आहे. राज्यात महायुती ला रिपब्लिकन पक्षाने खंबीर साथ दिली आहे.रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी महायुती चा जोरदार प्रचार केला आहे.काँग्रेस आणि विरोधी पक्षांचे संविधान बदलण्याचे खोडसाळ खोटे आरोप खोडून काढले आहेत.दलित बहुजन आंबेडकरी बौध्द मतदार महायुती च्या बाजूने उभा राहिल्यामुळे महायुतीला राज्यात बहुमत मिळणार आहे.
राज्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी 18 सभा घेतल्या.देशाचा केलेला विकास जनतेला सांगितला त्यामुळे किमान 35 ते 40 जागा महायुती महाराष्ट्रात जिंकणार आहे.असा विश्वास ना. रामदास आठवलेंनी व्यक्त केला.
0 टिप्पण्या