Ticker

6/recent/ticker-posts

गुलाब ताकतोडे यांचे नग्न आंदोलन, भर उन्हात तानात नगरपरिषद काटोल समोर बसले आहे उपोषणाला.

 
पल्लवी मेश्राम नागपूर 

 नागपूर :-माननीय मुख्याधिकारी नगरपरिषद काटोल यांनी वैयक्तिक राग व आकस मनात ठेवून गुलाब ताकतोडे यांच्या दुकानावर अतिक्रमणाची कारवाई केली, एकीकडे संपूर्ण काटोलात मोठमोठ्या व्यापारी,माजी नगरसेवक, माजी नगराध्यक्ष, यांचे रीतसर अतिक्रमण असून सुद्धा कोणतीही कारवाई त्यांनी केली नाही, परंतु एक सामान्य घरचा मातंग समाजाचा, उच्चशिक्षित,मुलगा  तो नंबर शाळेच्या पाठीमागे रहदारीला कोणताही त्रास होऊ न देता त्या ठिकाणी ठेला लावून नेट कॅफेचे दुकान चालवत होता परंतु वैयक्तिक राग मनात ठेवून, आकसापोटी गुलाब ताकतोडे याच्यावर अतिक्रमणाची कारवाई केली, एकीकडे पन्नालाल जमनादास कापड लाईन मध्ये धड पैदल चालता येत नाही अशाप्रकारे अतिक्रमण  असते, या नगरपरिषद समोरील चौपाटीवर हे युपी बिहारचे भैय्या  लोक यातील अतिक्रमण करून धंदे करत आहे, त्याचबरोबर तिथे अवैध धंदे पण खूप जोमात चालतात, परंतु त्यावर कोणतीही कारवाई न करता, काटोलातील गरीब मुलांना ती जागा धंद्यासाठी  न देता,हे बाहेरचे युपी बिहार चे लोक काटोल लातील लोकांचा रोजगार हिरावून मोक्याच्या जागा मठारल्या आहे हे मुख्याधिकारी साहेबांना दिसत नाही का, एकीकडे काटोलात बेरोजगारीचा प्रश्न  एरणीवर असून रोजगारासाठी धडपडणाऱ्या या गुलाब सारख्या मुलांना  जर न्याय मिळत नसेल तर काटोलातील युवांनी करावे काय हा प्रश्न आता येऊन पडला आहे,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या