विठ्ठल पाटील लातूर
लातूर :-घाटकोप मुंबई येथील अतिमहाकाय होर्डिंग पडून 18 जणांचा हकनाक जीव गेल्यानंतर भानावर आलेल्या राज्य शासनाने राज्यातील शहरासह मोठमोठ्या ग्रामपंचायत हद्दीमधील बेकायदा लटकवलेले होर्डिंग्ज बद्दल जिल्हा प्रशासनास कारवाहीचे सक्त आदेश दिल्याने जि.प.ग्रा.पं.विभाग, लातुर यांनी जिल्ह्यातील मोठमोठ्या गावातील ग्रा.पं.ला पञ देऊन होर्डिंग संदर्भात कारवाई करण्यास सांगितले होते.अशा प्रकारची बातमी वाचण्यात आली.म्हणुन या विषयी माहिती घेत सदर प्रकरणी जि.प.चे पञ/आदेश प्राप्त झाले आहे का.अशी विचारणा केलो असता अद्यापही असे कोणतेच पञ प्राप्त झाले नाही.अशी माहिती सरपंच विजय अंबेकर,ग्राम विकास अधिकारी एस.आर.कांबळे यांनी आमच्याशी फोनवरुन दिली आहे.तर याबद्दल पेपरबाजी करुन जनतेसह ग्रा.पं.ची दिशाभुल करण्याऐवजी जि. प.ग्रा.पं.विभाग,लातुरच्या संबंधित अधिका-यानी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करावी.व लोकांच्या दुकाणांपुढे महिना 2 महिने भलेमोठे होर्डिंग्ज ते पण विनापरवाना लावणा-या व स्वत:चे धंदे अतिक्रमीत जागेवर जोमात चालविणा-या आणि इतरांचे धंदे होर्डिंगच्या आड झाकणा-या
" बुरुड व्यवसायीकांवर " तसेच प्रकाशकांवर योग्य ती कारवाई करण्याचे धाडस जि.प.ने दाखवावे, अशी जनतेत चर्चा आहे ..
आंन्ध्रा,कर्नाटक,तेलंगणा या 3 पर राज्यांना जाणा-या राज्यमार्गालगत असलेले हे गाव उदगीर नंतर सर्वात मोठे लोकसंख्या व ग्रा.पं.असलेले गाव आहे.तसेच या गावात शेकडो डिजिटल हिरो असल्याने उठसुठ कांही ही प्रोग्राम असला की महाकाय डिजिटल राज्यमार्गालगत असलेल्या व बाजार पेठेत असलेल्या अनेकांच्या किराणा,कापड,मेडीकल,ई.दुकाणां - समोर विनापरवाना अहाकाय पोस्टर्स महिना 2 महिने लटकवण्याची फॅशन बुरुडांनीच येथे आणली आहे.कारण लटकवलेल्या होर्डिंगवरची तारीख संपली तरीही महिना2महिने होर्डिंग लटकलेलेच दिसतात.आणि वाढीव दिवसाचा वाढीव मोबदला { लाकडी व लोखंडी बांबूचा } मिळतोय म्हणुन बुरुड मंडळी हे होर्डिंग्ज काढेनात. व यामुळे अनेकांचे दुकाण होर्डिंगच्या आड आल्याने चालू आहे का बंद ? हे कळेचना.यामुळे अनेकदा या जागेत होर्डिंग लावु नका.अशी विनंती करित असलेल्या व्यापा-याशी कांही बुरुडं अरेरावी करतात.अशी चर्चा आहे.
आणि म्हणुन आता बेकायदा पोस्टर लावणा-यांना आळा बसावा आणि आर्थीक कळा याव्यात म्हणुन आता जिल्हा प्रशासनाने मोठ्या गावाच्या ग्रा.पं.प्रशासनास पञ देऊन अवैध होर्डिंग्ज संदर्भात पञ देऊन कारवाई करण्याचे सांगितले आहे.तसेच ज्या लोकांनी होर्डिंग लावले त्यांनी किती दिवसांचा परवाना घेतला होता.अण् फीस म्हणुन किती रक्कम ग्रा.पं.कडे जमा केली आहे.तसेच अवैधरित्या होर्डिंग्ज लावणा-या कितीजणांवर कारवाई ग्रा.पं.नी केली.या सर्व बाबी
चा आढावा जि.प.सोमवारी घेणार आहे.अशी पेपरबाजी जि.प.ने केली आहे.हाळी-हंडरगुळी सारखे २ मोठे गाव अंतरराज्यमार्गा लगत असल्याने तसेच येथे मोठी बाजार पेठ असलेने रोज पन्रास एक गावातील नागरीक येथे दैंनंदिन व्यवहारासाठी येत-जात असतात.तसेच सध्या कांहीही झाले की त्याचा मोठा गवगवा करण्याचे फॅड येथे आले असुन हंडरगुळीत तर शेकडो पोस्टर बाॅय आहेत.जे कांहीही झाले की महाकाय पोस्टर राज्यमार्गा लगतच्या दुकाणांपुढे व बाजारपेठे - तील दुकाणांपुढे महिना2महिने उभा करतात.ते ही नियमबाह्य.तसेच सा. बां.च्या जागेवर अतिक्रमण करुन स्वत:ची पोळी भाजुन घेणारी बुरुड व्यावसायीकांची टोळी ही इतर धंदे करणा-यांना तापदायक ठरत आहे. आणि म्हणुन या बाबत पेपरबाजी न करता प्रत्यक्ष येथे येऊन बेकायदा होर्डिंग्ज व अतिक्रमण हटविण्याचे धाडस जि.प.प्रशासनाने दाखवावे.
तसेच याबाबत माहिती विचारलो असता कसलेच आदेश वा पञ आले नाही.अशी माहिती सरपंच विजय अंबेकर व ग्राविअ.कांबळे एस.आर. यांनी यांनी दिली आहे.
दरम्यान पेपरबाजी करणा-या लातुर जि.प.प्रशासना मध्ये येथे येऊन थेट कारवाई करण्याचे धाडस नाही का .. अशी चर्चा हाळी-हंडरगुळीत होतेय.
0 टिप्पण्या