1)संघर्षाने घडते आहे अशी
एक ही सजीव मूर्ती,
दाही दिशांना पसरते संजीव भांबोरे साहेबांची कीर्ती.
2)सुरुवात केली समाजकार्याला अवघ्या सोळाव्या वर्षी. पत्रकारितेला झाली पहा
तीन दशकांची पूर्ती
पाहुनी संजीव जी आपणास तरुणांना येते स्फूर्ती.
दाही दिशांना पसरते संजीव भांबोरे साहेबांची कीर्ती.
3)तुमच्या कर्तुत्वाची छाप
पडते अनेक पदावरती .
मकरंदाची गोडी जिभेवर सहवासाने मने जिंकती.
राज्यभरात झाले बहु सन्मान किती करावी गिनती
दाही दिशांना पसरते संजीव भांबोरे साहेबांची कीर्ती.
4)धार लेखणीला तलवारीची अन्यायाला वाचा फोडती. माणुसकीच्या रक्षणा संजीवजी परंपरेच्या बंधनाला तोडती. चमचेगिरि अन् लाचारीला कधीच ना जुमानती .
दाही दिशांना पसरते संजीव भांबोरे साहेबांची कीर्ती
5)छ. शिवाजींना मुजरा फुले शाहू आंबेडकरांना वंदती. विचारात काशीरामजी
साहित्य अण्णाभाऊंचे वाचती. निर्भीड करती अपंग अबलांना अन्याय अत्याचार चौफेर मांडती.
दाही दिशांना पसरते संजीव भांबोरे साहेबांची कीर्ती
6)गल्ली असो की दिल्ली सत्यासाठी आंदोलन उभारती निस्वार्थ स्पष्ट तत्परतेची
तोफ अशी गर्जती जातीपातीच्या पाडण्या भिंती विद्रोहाची मशाल हाती घेती.
दाही दिशांना पसरते संजीव भांबोरे साहेबांची कीर्ती
कवी -समाजभूषण -रत्नराजश्रीपुत्र
मकरंद पाटील जळगाव

0 टिप्पण्या