Ticker

6/recent/ticker-posts

एटीएम, सीडीएम मशीन फोडून ११ लाख लंपास

वैजापूर येथील घटना 

रुपाली डोंगरे चित्रा न्युज 
छत्रपती संभाजीनगर :-वैजापूर येथील म्हसोबा चौकातील आयडीबीआय बँकेचे एटीएम व सीडीएम मशीन फोडून ११ लाख ३९ हजार रुपयांची रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गेल्यावर्षी याच बँकेचे एटीएम फोडून चोरट्यांनी लाखो रुपये लंपास केले होते.

वैजापूर येथील म्हसोबा चौकात आयडीबीआय बँकेचे एटीएम व सीडीएम मशीन आहे. शुक्रवारी मध्यरात्री या बँकेची ही दोन्ही मशीन गॅस कटरने कापून त्यातील रक्कम चोरट्यांनी लंपास केली. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी एटीएम मशीनमधून ४ लाख ४ हजार २०० रुपये व सीडीएम मशीनमधील ७ लाख ३४ हजार ८०० रुपये चोरून नेले.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलिस अधीक्षक महक स्वामी यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी बँकेचे शाखा व्यवस्थापक गोविंद निर्मल यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे हे करीत आहेत. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या