Ticker

6/recent/ticker-posts

परवड अण् पळापळ ....सर्वसामान्यांच्या कुटूंबांचे रक्षणकर्ते वाढवणा पोलिसांचे कुटूंब राहतात डेंजर झोन मध्ये ......

 विठ्ठल पाटील लातूर 
लातूर :-आधुनिकीकरण हा सध्या सगळीकडे चर्चीला जाणारा म्हत्वाचा विषय.तसा हा विषय पोलिसदलात ही चर्चीला जात आहे.माञ उदगीर तालुक्यातील निजामकालीन ठाणे असलेल्या मौजे वाढवणा बुर्द्रूक येथे जनसेवेसाठी सदा तत्पर असलेल्या आणि सामान्य नागरिकांचे रक्षण करणा-या पोलीस दादा,मामा,काकायांचे राहते सरकारी क्वाॅटर्स / खोल्या नादुरुस्त व पडीक झाल्याने तेथे राहण्याचे धाडस कांही सगळेच पोलीसं दाखवित नाहीत.पण जे चार,दोनजण दाखवितात त्यांचे कुटूंबिय माञ जीव धोक्यात घालुन डेंजर झोन मध्ये राहतात.आणि फक्त शासकिय रुम अभावी बाहेरगावातुन नोकरीच्या ठिकाणी ये-जा करताना माञ पोलिसांची परवड व पळापळ होताना दिसत आहे.तेंव्हा वरिष्ठांनी या बाबींची दखल घेऊन आधुनिक पध्दतीने पोलीस वसाहतींचे बांधकाम करणे गरजेचे आहे.
राज्यातील पोलीस दलाचे आधुनिकी - करण हा विषय सध्याला अतिशय म्हत्वाचा बनला व चर्चीला जात आहे. आधुनिकीकरण म्हणजे नेमके काय व ते कसे असावे.यावर भरपुर चर्चाही होताना ऐकू येते.आधुनिक शस्ञे व साधने,चांगली वाहने,पो.स्टे.करिता सुसज्ज व सर्व सोनियुक्त इमारत,सी. सी.टि.व्ही.कॅमेरे,कालानुरुप प्रशिक्षण आदी गोष्टी या आधुनिकीकरणामध्ये येतात.देशभरात यासाठीची बरीचशी कामे झाली आहेत.तसेच पोलीसांचे पेमेंट व अन्य सुविधांमध्येही अलीकडे बर्र्यापैकी वाढ होत आहे.आणी हे सर्व बदल सकारात्मक व स्वागतार्ह असले तरी ते तुलनेने अपुरे आहेत किंवा त्यांना परिपुर्ण बदल मानता येत नाही.अगदी याचा कांहीअंशी प्रत्यय क्रिडा मंञ्याचा मतदार संघा मधील वाढवणा गावच्या ठाण्यातील पोलीस वसाहत यांच्या बाबत येत आहे.कारण येथे कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी असलेल्या शासकीय वसाहतीची वाट लागल्याचे दिसते.म्हणुन येथे सर्वञ पडझड झालेली जिर्ण व भग्नावस्थेत दिसत असलेल्या खोल्यांमध्ये राहणे म्हणजे स्वत:सह कुटूंबियांना *डेंजर* *झोन* मध्ये लोटण्यासारखे असलेने २/४ वगळता बहूतांश पोलीस दादा हे अन्य ठिकाणाहुन नोकरीच्या ठिकानी ये-जा करतात.आणि हे करताना त्या पोलीसांची मोठी परवड व पळापळ होताना दिसते.म्हणुन "सद रक्षणाय.. 
खल निग्रहनाय" असे म्हणत स्वत:चा जीव डेंजर झोन मध्ये घालुन ड्युटी करणा-या वाढवणा येथील पोलीस वर्गासाठी असलेल्या वसाहतीच्या नुतनीकरणाकडे व आधुनिकीकरणा कडे क्रिडा मंञी महोदय जातीने लक्ष देत का नाहीत?असा सवाल चर्चीला जात असुन,वरिष्ठांसह मंञ्याच्या भुमिकेकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या