Ticker

6/recent/ticker-posts

ताडपञी के निचे क्या है ? ताडपञी के निचे हाळी-हंडरगुळी मार्गे वाळू ऐवजी

गुटखा,चंदन,सागवान यांची तस्करी,वाहतूक होत असल्याची चर्चा. . 

 विठ्ठल पाटील लातूर 
लातूर :-गत कांही दिवसा पासुन हाळी--हंडरगुळी (ता.उदगीर) मार्गे ट्रक,ट्रॅक्टर व टिप्पर मधून वाळू - रेती वाहतूक मोठ्याप्रमाणात होताना दिसुन येत असुन बहूतांश वाहणांतुन नियमबाह्यरित्या वाळूची वाहतूक होते.तर टिप्पर व अन्य कांही गाड्यांमधून रंगीबेरंगी ताडपञी झाकुन रेती वाहतूक होत असल्याचे दिसते.आणि या ओव्हरलोड वाळू वाहतुक करणारे तस्कर संबंधितांना हाताशी धरुन शासनाला चुना लावत असल्यामुळे व प्रशासन कोमात गेल्यामुळे हे असले वाळू तस्कर जोमात ! वाळुच्या गाड्या पळवितात.तसेच स्टाॅक करुन विकणा-यांजवळची रेती नियमा प्रमाणे राॅयल्टी भरुन आणलेली असते का चोरीची.कारण,हाळी व वाढवणा येथे अनेकजण रेतीचे ढिगारे रचुन ती रेती विकत असतात.
अशी कुजबूज जाणकार मंडळी करत असुन चोरटी वाळू वाहतुकीला आर्शिवाद कुणाचा. व *ताडपञी के अंदर क्या है* ? *ताडपञी के अंदर*
.कारण जर नियम व कायदा पाळून राॅयल्टीनुसार वाळू वाहतुक करत असतील तर ती ताडपञी झाकुन राञी घेऊन जायची गरज काय ? तेंव्हा अनेक वाहणातुन राञं- दिवस ताडपञी झाकुन जाणा-या गाड्यांमध्ये वाळूच असते का? वाळू च्या नावाखाली *चंदन,सागवान* तसेच *गुटखा* यासारख्या वस्तूंची वाहतूक /तस्करी होत असेल.याचा कांहीच भरवसा नाही.तेंव्हा खा-खा खाऊन सुस्त झालेले महसुलचे संबंधित अधिकारी होश मध्ये येतील व कार्यवाही करतील का व कधी. याकडे हाळी-हंडरगुळी परिसरातील जनतेचे लक्ष लागले आहे..                 
वाळू तथा रेतीच्या वाहतुकीसाठी शासनाकडे तशी राॅयल्टी भरुन किती वाळू हवी आहे. याबद्दल रितसर परवाना घ्यावा लागतो.आणि मग असा परवाना काढणारे परवान्यानुसार वाळू / रेती वाहतूक उघडउघड करतात.माञ गत कांही महिण्यापासुन हाळी मार्गे ट्रक, ट्रॅक्टर व टिप्पर मधून दिवसा कमी व राञीच्या वेळी जास्त प्रमाणात ते ही ताडपञी झाकुन वाहतूक होतानाचे चिञ सामान्य जनतेस दिसत आहे. माञ संबंधित प्रशासनास दिसत कसे नाही.यामागील "अर्थ" व "कारण" काय ? असा प्रश्न उपस्थित होतो.जर परवान्याप्रमाणे वाळूची वाहतूक होत असेल तर तसेच खरोखर वाळूच असेल तर मग  वाहणांना ताडपञी झाकायची गरजच काय ? तेंव्हा ताडपञीच्या व वाळूच्या आडून *गांजा* *चंदन,सागवान,गुटखा* यासारख्या मालांची तस्करी होत असेल.अशी शंका नाकारता पण येत नाही.तेंव्हा ताडपञी के अंदर क्या है ? ताडपञी के अंदर ? संबंधित गाडीत बुडात *सांगवान,गुटखा,चंदन* लपवून वरतुन रेती टाकत नसतील का ? याचा शोध घेऊन कडक कार्यवाही करायची धमक दाखविणे गरजेचे आहे.तेंव्हा अशी धमक कोण व कधी दाखविणार.याकडे हाळीसह भागातील जनतेचे लक्ष लागले आहे..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या