विजय चौडेकर चित्रा न्यूज

नांदेड :- मदतमास व किदमतमास या विषयी राज्याचे महसूलमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी मंत्रालय स्तरावर बैठक घेतली.
या बैठकीला माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण साहेब,आमदार बालाजीराव कल्याणकर,आमदार सुरेशराव धस,आमदार सीमाताई हिरे, माजी आमदार संजय दौंड, बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक,नांदेडचे अतिरिक्त जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांच्यासह मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते...
अनेक वर्षापासूनचा नांदेड येथील नागरिकांचा प्रश्न महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी लक्षात घेऊन बैठक लावली आहे,त्यामुले जनतेत समाधान व्यक्त होत आहे. येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत हा विषय मांडून राज्य सरकार मार्फत हा विषय मार्गी लावण्यात येईल असे बैठकीत आश्वासन दिले आहे.