Ticker

6/recent/ticker-posts

लाखनी शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडण्याचे मार्गावर

 वाहतूक नियमांची पायमल्ली

पोलिस ठाण्यासमोरून केली जाते अवैध्य प्रवासी वाहतूक


कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :- लाखनी शहरातील वर्दळीच्या  बसस्थानक , सिंधीलाईन चौक तथा तहसील कार्यालय परिसरात  महामार्गासह सर्व्हिस रोडवर प्रवासी वाहणे उभी केली जात असल्यामुळे इतर वाहनांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो याशिवाय मर्यादेपेक्षा अधिक प्रवासी भरून पोलिस ठाण्यासमोरून वाहतूक करून नियमांची पायमल्ली केली जाते. वाहतूक सुचारू पद्धतीने व्हावी याकरिता वाहतूक शिपायाची नेमणूक केली असली तरी नियंत्रण नसल्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडण्याचे  मार्गावर असल्याचे चित्र दिसत आहे. 
       लाखनीत उच्च शिक्षणाची सोय , मोठी बाजारपेठ व तालुक्याचा दर्जा मिळाल्यापासून सर्वच शासकीय , निम -शासकीय  कार्यालयामुळे कार्यालयीन कामे , खरेदी व शिक्षणासाठी ग्रामीण परिसरातून दररोज हजारो महिला, पुरुष व विद्यार्थी शहरात येत असतात याशिवाय शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ (जुना ६) मुळे वाहनांची वर्दळ असते. भरीस भर म्हणून बसस्थानक व तहसील तथा सिंधीलाईन चौकात महामार्गासह सर्व्हिस रोडवर अवैध्य प्रवासी वाहणे तथा फुटकळ विक्रेत्यांची अतिक्रमणामुळे वाहन चालकास आजूबाजूने येणारी वाहने दिसत नसल्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. 
       शहरातून भंडारा, नागपूर , साकोली , अड्याळ , सालेभाटा , रेंगेपार / कोठा, मुरमाडी/ तूप, पालांदुर , किटाडी इत्यादी मार्गावर अवैध्य प्रवासी वाहतूक करणारे आटो , टाटाएस, ट्रॅव्हल्स , यासारखी वाहणे धावत असतात . यात क्षमतेपेक्षा दुप्पट तिप्पट जनावरासारखे प्रवासी कोंबून पोलिस ठाण्यासमोरून खुलेआम वाहतूक केली जाते . या प्रकाराने एखादवेळा मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही . वाहतूक व्यवस्था नियंत्रित करण्यासाठी वाहतूक पोलिसांची नेमणूक केली असली तरी ते शहाराव्यतिरिक्त केसलवाडा/ वाघ फाट्यावरच तैनात असल्यामुळे शहरात वाहतूक व्यवस्था विष्कळीत होत असल्यामुळे नवनियुक्त पोलिस निरीक्षक सत्यवीर बंडीवार यांनी शहरातील वाहतूक व्यवस्थेकडे लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे . 

वाहतूक नियमांची पायमल्ली
बसस्थानक परिसरात २०० मीटर पर्यंत अवैध्य प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रवेश नाही मात्र या नियमाची कुठेही  अंमलबजावणी होताना दिसून येत नाही . शहरातील चौकात अतिक्रमणामुळे अपघात होण्याची शक्यता असली तरी याकडे मात्र  दुर्लक्ष होत आहे .
 
क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक

प्रवासी वाहतूक  करणाऱ्या वाहनांना ६ +१ याप्रमाणे प्रवासी वाहतूकीचा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांचेकडून परवाना दिला जात असला तरी या प्रवासी वाहनांमध्ये २० ते २५ प्रवासी भरून वाहतूक केली जात असली तरी या गंभीर बाबीकडे लक्ष देण्यास कुणालाच सवड नाही .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या