पंकज पाटील चित्रा न्युज
जळगाव :- अमळनेर येथुन दरवर्षीप्रमाणे, हा वर्षीही अमळनेर येथील दादासाहेब जीएम सोनार नगरच्या गजानन महाराज मंदिरातून पायीवारी आयोजित करण्यात आली आहे ज्यामध्ये गजानन भक्त मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. या वर्षी पायी वारीची सुरुवात ६ नोव्हेंबर २०२४, बुधवार रोजी सकाळी ५ वाजता महा आरतीने - होईल, त्यानंतर पायी वारी सकाळी ७ वाजता निघेल. या वारीसाठी हे बारावे वर्ष आहे १ आणि वारी शेगावकडे जाणारी आहे.
शेगावला ११ नोव्हेंबर २०२४ रोजी पोहोचण्याची अपेक्षा आहे, अशी माहिती पायी वारी - प्रमुख व संत गजानन महाराज सेवा संस्थेचे अध्यक्ष प्रा. आर.बी. पवार यांनी दिली.सर्व गजानन भक्तांना - कळवावयाचे आहे की, अमळनेर - वरून बारावे वर्ष आहे. श्री क्षेत्र - शेगावी पायी वारीला यशस्वी - करण्यासाठी इच्छुक भक्तांनी - वारी प्रमुख प्रा. पवार यांच्याशी संपर्क साधून फॉर्म भरण्याचे - आवाहन केले आहे.
वारीत - सकाळी नाश्ता, चहा, दुपारचे जेवन, चहा, रात्रीचे जेवन, रात्री मुक्कामाची व्यवस्था गजानन महाराज भक्त व सामाजिक कार्यकर्ते यांनी केली आहे.तसेच या वारीसाठी पाण्याची व्यवस्था श्री गजानन ग्रुप करणखेडा व डॉ. प्रशांत शिंदे साई सेवा हॉस्पिटल, अमळनेर कडून करण्यात आली आहे.तसेच औषधी पुरवठा मेडिकल असोसिएशन, अमळनेर देणार आहेत. श्री निलेश प्रविण पाटील खेडी यांच्याकडून ट्रॅक्टर सेवा उपलब्ध - असेल. वारीमध्ये सहभागी होऊ - इच्छिणा-यांनी अधिक माहितीसाठी वारी प्रमुख - आर.बी. पवार यांच्याशी संपर्क - साधावा.त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांकः ९४ २३ ९० ३० १४ / ९८ २३ २६ ०१ ०३ आहे.सर्व भक्तांनी या पायी वारीत सहभागी होऊन गजानन - महाराजांचा आशीर्वाद घेण्याची - अपर्णा करू शकतात !
0 टिप्पण्या