चित्रा न्युज ब्युरो
नांदेड : वंचित बहुजन आघाडीचे नांदेड दक्षिणचे उमेदवार फारूक अहमद यांनी वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या, प्रा.अंजलीताई आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी हजारो नागरिकांनी हजेरी लावली होती.
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने १२९ उमेदवार जाहीर केले आहेत. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली आहे तसेच विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर प्रचाराला सुद्धा जोरदार सुरुवात केली आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या अर्ज दाखल करताना होणारी गर्दी पाहून राज्याचे राजकीय गणित बदलणार असे चित्र आहे. लोकसभा निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडीने गिअर बदलला असून, विधानसभेची जोरदार तयारी केल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता विधानसभेत वंचित बहुजन आघाडी मोठी कमगिरी करणार अशी आशा जनतेमधून व्यक्त होत आहे.
0 टिप्पण्या