Ticker

6/recent/ticker-posts

रिसोड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रशांत गोळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल



चित्रा न्युज ब्युरो
रिसोड : वंचित बहुजन आघाडीचे रिसोड विधानसभेचे उमेदवार प्रशांत सुधीर गोळे यांनी शुक्रवारी( दि.२५ ऑक्टोबर) उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी प्रशांत गोळे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या प्रा. अंजालीताई आंबेडकर यांनी केले.

वंचित बहुजन आघाडीने आतापर्यंत १२९ उमेदवार जाहीर केले आहेत. ठिकठिकाणी उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली आहे. जनतेचा वाढता प्रतिसाद पाहता प्रस्थापित पक्षांनी वंचितचा धसका घेतल्याचे दिसत आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून नाराज असलेला आरक्षणवादी समूह वंचितच्या पाठीशी उभा राहताना दिसत असल्याने विधानसभेत वंचित यशस्वी कमबॅक करणार अशी चर्चा सुरू आहे.
---


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या