Ticker

6/recent/ticker-posts

आनंद दिवाकर चक्रनारायण पाली विषयात नेट उत्तीर्ण

चित्रा न्युज ब्युरो
मुंबई :  सामाजिक कार्यकर्ते लेखक कवी आनंद दिवाकर चक्रनारायण हे पहिल्याच प्रयत्नात पाली विषयात नेट उत्तीर्ण झाले असून मुंबई विद्यापीठातून एमए पाली नियमित विद्यार्थ्यांमधून ते एकमेव उत्तीर्ण झाले आहेत .

विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात यूजीसी नवी दिल्ली मार्फत देशभरातील विद्यार्थ्यासाठी प्राध्यापक पदाची पात्रता आणि पीएच डी प्रवेशासाठी नेट परीक्षा घेण्यात येते.यावर्षी पाली विषयात या पात्रतेसाठी अत्यंत वरचा टक्का गेला. नुकताच केंद्र शासनाने पाली भाषेला दिलेला अभिजात भाषेचा दर्जा आणि हा निकाल एक सुवर्णयोगच म्हणावा लागेल .

त्यांच्या या यशाबद्दल अखिल भारतीय भिक्खू संघाचे अनुसंघनायक पुज्य भदंत बोधिपालो महाथेरो, नीलिमा बबन कांबळे, आचार्या डॉ. कमलताई गवई, कीर्तीताई अर्जुन, पद्मश्री डॉ. सुखदेव थोरात, डॉ यशवंत मनोहर , माजी कुलगुरू डॉ बी ए चोपडे, डॉ योजना भगत, डॉ निरज बोधी, प्राचार्या सुर्यकांताताई गाडे, डॉ. प्रदीप आगलावे, डॉ. रेखा मेश्राम, राजेश ढाबरे, प्रा. विजयकुमार गवई, डॉ. म.सु.पगारे, प्राचार्य डॉ. शंकर अंभोरे, डॉ. प्रफुल्ल गडपाल, प्राचार्य डॉ.कमलाकर पायस, डॉ एम डी शिरसाट, प्राचार्या जॅकलीन स्मिथ डोळस,आदींनी अभिनंदन केले आहॆ.
----


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या