विजय चौडेकर नांदेड जिल्हा प्रतिनिधी चित्रा न्यूज
नांदेड :- महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील व तालुक्यातील आणि गावा गावातील सुशिक्षित उच्चशिक्षित सुधारीत दिव्यांग (अपंग व्यक्ती) बांधव आणि त्यांचे मतदान करणारे कुटूंबातील पालक व सदस्यांनी मतदान करते वेळी आता विचार करुन मतदान करावे ..
कारण पाच ते दहा वर्षांत दिव्यांग बांधवांसाठी ग्रामपंचायत , जिल्हा परिषद, पचांयत समिती, महानगरपालिका, नगरपालिका ,ग्रामपंचायत मध्ये किती योजना सुरु केल्या पाच ,दहा वर्षापूर्वी पासून ते आजपर्यंत सरपंच, नगरसेवक, आमदार ,खासदार मंत्री यांच्या निधीतून ५% निधी हे दिव्यांग बांधवांवर खर्च करायचा असतो आणि राजकीय नेते मंडळी असणारे उमेदवार यांनी दिव्यांग बांधवा विषयी मंत्रालयात कोण कोणत्या प्रकारचे प्रश्न उपस्थित केले आणि कोण कोणत्या समस्या सोडवण्यासाठी स्वतः पुढाकार घेतला का?
वार्षिक...५%निधी कुठे व केव्हा दिली..
*1)ग्रामपंचायत 5%दिव्यांग निधी*
*2)पंचायत समिती 5% दिव्यांग निधी*
*3)जिल्हा परिषद 5% दिव्यांग सेस निधी*
*4)दिव्यांग पेन्शन 5000ते6000 रुपये मिळायला हवे होते. पण 1500 दरमहा राज्य शासन कडून मिळतो तोही वेळेवर मिळत नाही..)*
*5)50% घरपट्टी माफ होईल...ज्या गावातील घरात दिव्यांग रहात असेल आणि त्या ऍड्रेस चा रेशन कार्ड असेल आणि दिव्यांग व्यक्तीचे अंत्योदय रेशन कार्ड मध्ये नाव सामाविष्ट करण्यासाठी कोण प्रयत्न केले विना आट घरकुल योजना तात्काळ दिव्यांगाना का मिळत नाही.. या कडे पुढारी जनसेवकांचे नेहमी दुर्लक्ष का होतोय.. हे सामान्य दिव्यांगच्या समस्या आहेत..ते कोणकोणते पक्षाचे राजकिय पुढारी व कार्यकर्ते सोडवण्यासाठी स्वतः समोर आले का.*
आणि आज जे १५००रु पेन्शन तेही वेळेवर मिळत नाही यात दिव्यांगच्या उधरनिरवा कसा काय होणार ..कमीत कमी ५००० ते ६०००रु पेन्शन वाढण्यास आजी माजी आमदार मंत्री सत्ताधारी अथवा विरोधी पक्ष किती पुढारी नेते सक्रिय सहभागी मंडळी व कार्यकर्ते काय केले,,,, आज ही दिव्यांग व्यक्तींना आपले हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले नाही. आता दिव्यांगचे मतदान घेणारे कीती आहेत...हे समजेल.
विजय चौडेकर, पत्रकार, प्रहार दिव्याऺग सऺगठन नांदेड शहर अध्यक्ष,,मो,9529944770,🙏
0 टिप्पण्या