Ticker

6/recent/ticker-posts

ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या हस्ते वंचितच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन !


चित्रा न्युज ब्युरो
पुणे : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते वंचित बहूजन आघाडी पुणे शहर मध्यवर्ती कार्यालयाचे यांच्या हस्ते शनिवारी (दि.11) उद्धाटन झाले.

या वेळी राष्ट्रीय महासचिव ॲड. प्रियदर्शी तेलंग, राष्ट्रीय उपाध्यक्ष क्रांतीताई सावंत, राष्ट्रीय कोशाध्यक्ष महेश भारतीय, राष्ट्रीय सदस्य अशोकभाऊ सोनोने, राष्ट्रीय सदस्य  किसन चव्हाण, राष्ट्रीय सदस्य डाॅ. नितीन ढेपे, राष्ट्रीय सदस्य सुजाता वालदेकर, राष्ट्रीय सदस्य सविताताई मुंढे, वसंतदादा साळवे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

पुणे शहराध्यक्ष ॲड. अरविंद तायडे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. या वेळी ॲड. किरण कदम, बाबासाहेब कांबळे, अनिताताई चव्हाण, सागर आल्हाट, विशाल कसबे, चैतन्य इंगळे यांच्यासह शहरातील आजी माजी पदाधीकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी तसेच हितचिंतक यांनी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
-----


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या