Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र राज्य प्राथमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी व मंडळाचे इतर पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी अकोला खदान पोलीस स्टेशन मध्ये युवा आघाडीचे वतीने तक्रार दाखल.


चित्रा न्युज ब्युरो
अकोला :- इयत्ता १o आणि  १२ च्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्ड च्या परीक्षा हॉल तिकीट वर 
विद्यार्थ्यांच्या जातीच्या प्रवर्ग टाकणाऱ्या बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांच्यावर परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांशी जातीभेद करण्याबाबत गुन्हे दाखल करावे ह्यासाठी वैभव पंडित खडसे,वंचित बहुजन युवा आघाडी, महानगर अध्यक्ष ह्यांनी आज पोलीस स्टेशन खदान येथे तक्रार दाखल केली आहे.
यापूर्वी कधीही विध्यार्थी यांचे परीक्षा केंद्र हॉल तिकीट वर जातीचा उल्लेख करण्यात  आला नाही.विध्यार्थी परीक्षा केंद्रात परीक्षा देताना त्याच्या जातीचा उल्लेख करून केंद्रावर जातीभेद करून विदयार्थ्यांना परीक्षेतून बाद व नापास करण्यासाठी प्रवृत्त करणे हा गुन्हा आहे या बाबीची दखल घेऊन शरद गोसावी व मंडळाचे इतर पदाधिकारी यावर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या