Ticker

6/recent/ticker-posts

वाळू डेपो मध्ये वाळूचा साठा असून ही गरिब दिव्यांग, व्यक्तीला घरकुल बांधण्यासाठी पाच ब्रास वाळू मिळत नाही,तर हि वाळू जाते कुठे,,

विजय चौडेकर नांदेड जिल्हा प्रतिनिधी 

नांदेड -शासनाने प्रत्येक घाटावर वाळू डेपो मध्ये साठा करून घरकुल बांधकाम करण्यासाठी गरिब, दिव्यांग, नागरिकांना पाच ब्रास वाळू उपलब्ध करून देण्यात यावी म्हणून डेपो तयार केले आणि तेथे वाळू साठा करून काहि ठराविक रक्कम भरून पाच ब्रास वाळू देण्यात येईल हा फतवा काढला परंतु आज वर घरकुल बांधकाम करण्यासाठी वाळू उपलब्ध करून दिली च नाही, बर्याच घरकुल लाभार्थीनी वाळू साठी ऑनलाईन अर्ज दाखल केले तरीही वाळू काही भेटना फक्त उडवाउडवीची उत्तरे दिली जातात, तहसीलदार सांगतोय ऑनलाईन अर्ज दाखल करा वाळू भेटेल ऑनलाईन करायला गेले कि तो सांगतो वाळू डेपो मध्ये उपलब्ध नाही जेव्हा उपलब्ध होईल तेव्हा पावती दिली जाईल वाळू माफिया सर्रास चढ्या भावाने वाळूची विक्री करत आहेत,तर हि वाळू कुठून येते हजारों ब्रास वाळू रोज उपसा केली जाते 
ती वाळू डेपो मध्ये साठा न करता अवैध वाहतूक करुन माफिया मार्फत विक्री जोमात केली जाते या मध्ये महसूल अधिकारी यांचा हात असतो, तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार,यांच लक्ष असतं कुठ रोज शेकडो ब्रास वाळू लंपास होत असते दिवसाढवळ्या हायवा गाड्या वाळू भरून वाहतूक करत असतात त्याची निगराणी कोण करणार गरिबांना घरकुल बांधण्यासाठी पाच ब्रास वाळू भेटत नाही शेकडो ब्रास वाळू जाते कुठे महसूल अधिकार्यांना मलिदा खाण्याशी मतलब त्यांना विचारणार कोण एस पी,डि वाय एस पी, साहेब, ग्रामीण पोलीस,पी आय, यांनी बर्याच ठिकाणी छापे टाकून वाळू उपसा करणारे यंत्र, वाळू वाहतूक करणाऱ्या गाड्या,व, वाळू चा मोठ्या प्रमाणात साठा धरला तो शासकीय वाळू डेपो मध्येच जमा झाला असेल जर तीच वाळू गरिबांना घरकुल बांधकामासाठी उपलब्ध करून द्यावी सामाजिक कार्यकर्ता विजय चौडेकर,मी कलेक्टर साहेबांना विनंती करतो गरिबांना मदत होईल अर्धवट बांधलेले घरकुल पुर्ण करता येईल, तरीही जिल्हा अधिकारी साहेबांनी वेळीच विचार करावा,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या