विजय चौडेकर नांदेड जिल्हा प्रतिनिधी
नांदेड -इतर मागास बहुजन कल्याण दुग्ध विकास व अपारंपारिक ऊर्जा विभाग मंत्री, महाराष्ट्र राज्य व नांदेड जिल्हयाचे पालकमंत्री अतुल सावे यांना वाढदिवसानिमित्त मोफत रोग निदान व आरोग्य तपासणी शिबीर उमरेकर मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल येथे भाजपा वैद्यकीय आघाडी संयोजक डॉ सचिन उमरेकर यांच्या प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शनाखाली संपन्न झाले
सदरील शिबिरा 138 रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला या शिबिरास डॉ सचिन उमरेकर (अस्थिरोग तज्ञ) डॉ. सोनिया सचिन उमरेकर (स्त्रीरोग तज्ञ ) डॉ प्राची दहाट ( रेडिओलॉजिस्ट) डॉ. सचिन ढवळे (जनरल सर्जन) डॉ. धनंजय मोरे (अस्थिरोग तज्ञ) डॉ. माधव ढगे ( दंतरोग तज्ञ) डॉ. सौरभ पाटील (नेत्ररोग तज्ञ) या सर्व तज्ञ डॉक्टरांनी या शिबिरास मोफत तपासणी व उपचार करण्यात आले शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रशांत वायंगणकर, चंद्रकांत कांबळे,किरण शिरसाट,सुनील वाडेकर,करण तिडके,सर्जेराव वडजे, सरिता सुरोशे, स्वाती राखी दत्तात्रय मोरे, बंडू मधेवाढ, चक्रधर कदम या सर्वांनी सहकार्य केले


0 टिप्पण्या