Ticker

6/recent/ticker-posts

माता पालकांनो इंग्रजी शाळेवर खर्च करण्यापेक्षा आपल्या पाल्यांना मोफत जिल्हा परिषद शाळेत प्रवेश द्या..


गावची जिल्हा परिषद शाळा म्हणजे गावची संपत्ती आहे.

श्रीकांत बारहाटे जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण हिंगोली

हिंगोली:- वसमत तालुक्यातील किन्होळा जिल्हा परिषद शाळेत सक्षम माता सक्षम पिढी होण्यासाठी निपुण भारत कार्यक्रमांतर्गत महिला मेळाव्याचे आयोजन शाळा समितीचे अध्यक्ष मुंजाजी महादू जाधव यांनी जिल्हा परिषद प्राथमिक विद्यालय किन्होळा येथे माता पालक समाज मेळावा व हळदी कुंकवाच्या कार्यक्रम घडवून आणला गटशिक्षणाधिकारी सतीश काष्टे व केंद्रप्रमुख सुभाष खरबडे यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती सर्वप्रथम मा जिजाऊ व शिक्षणाची आराध्य दैवत माता सावित्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून अज्ञान ज्योती गावातील महिलांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पेटवून आलेल्या माता पालकांचा शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला शाळा समितीच्या वतीने आलेल्या सर्व मान्यवरांचा देखील सन्मान करण्यात आला तहसील प्रशासनाच्या वतीने महिला प्रतिनिधी मंडळ अधिकारी सौ प्रियंका खडसे यांनी महिलांना आपल्या पाल्याबद्दल मार्गदर्शन केले शाळा समितीचे अध्यक्ष बोलताना म्हणाले माता पालकांनो जिल्हा परिषदेची शाळा म्हणजे आपली संपत्ती आहे इंग्रजी शाळेत लाखो रुपये खर्च करून ज्ञान मिळवण्यापेक्षा सरकारी शाळेतच ज्ञान उत्तम प्रकारे मिळतो तेवढाच पैसा विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करा जेणेकरून दहावी बारावीनंतर त्यांच्या उच्च शिक्षणाला कामी येईल माझ्या मुलीचा गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश देऊन सुरुवात केलीय आपणही करा असा मोलाचा संदेश याप्रसंगी शाळा समितीचे अध्यक्ष यांनी उपस्थित माता पालकांना दिला .यावेळी गटशिक्षणाधिकारी व केंद्रप्रमुख यांनीही सखोल असे मार्गदर्शन माता पालकांना केले नेहमी घर कामात व्यस्त असणाऱ्या माता पालकांना व्यासपीठ मिळावं व त्यांचा आनंद द्विगुणीत करावा यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या शाळेमध्ये माता पालकांच्या विविध स्पर्धा घेऊन त्यांना शाळेच्या वतीने विविध पारितोषिक देखील देण्यात आली याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद शिक्षिका तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक पालक माता पालक व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या