Ticker

6/recent/ticker-posts

बस तक्रारी बाबत आगार व्यवस्थापकाशी अ. भा.ग्राहक पंचायत ने केली चर्चा

चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा :-आगार व्यवस्थापक भंडारा सौ लिमजे मॅडम यांना  नवीन बस मागणी, बऱ्याच मार्गावर बस फेरी वाढविणे, नादुरुस्त बसेस, तक्रार नोंदवही   प्रथमोपचार पेटी बस मध्ये असावी, डेपो मॅनेजर व इतर महत्वाचे फोन नंबर बस मध्ये लिहिलेले असावे, बसेस नादुरुस्त असल्यामुळे रस्त्यात बंद पडतात , पाणी टाकी सफाई, महिन्यातून एकदा प्रवाशी ग्राहक दिन  घेऊन ग्राहक पंचायत ला आमंत्रित करणे असल्या बऱ्याच विषया वर चर्चा झाली.
शिष्ट मंडळात   अखिल  भारतीय विदर्भ प्रांत सचिव नितीन काकडे,  भंडारा जिल्हा संघटक जयंत सब्जीवाले,  सचिव अनिल शेंडे, रवींद्र तायडे, कृष्णा खेडीकर, चंद्रशेखर साठे  उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या