Ticker

6/recent/ticker-posts

हाळी-हंडरगुळीत ईद उत्सहात संपन्न..हिंन्दू-मुस्लिम एकतेचा संदेश.


चित्रा न्युज प्रतिनिधी
हंडरगुळी / मुस्लिम धर्मीयांमध्ये खुप म्हत्व असलेला महिना म्हणजे रमजान.आणि याच महिण्याच्या शेवटी येतो तो "खुदबा" आणि हा "खुदबा" हाळी-हंडरगुळी ता.उदगीर येथे मोठ्या आनंदात व उत्सहामध्ये साजरा करण्यात आला.
सकाळी नमाज पठण झाल्यानंतर एकमेकांना अलिंगन देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.यात हिंन्दू-मुस्लिम दोस्त-मिञांनी एकमेकांना रमजान ईद (खुदबा) मुबारक.असे म्हणत अलिंगन देत शुभेच्छा दिल्या.आणि हिंन्दू-मुस्लिम एकतेचा संदेश दिला. 
"खुदबा" म्हणजे "ईद" हा सण म्हंजे मुस्लिम धर्मीयांसाठी "दिवाळी" या सणासारखाच असतो.असे म्हणने चूक ठरु नये.
कारण,ज्या प्रमाणे "दिवाळी" मध्ये हिंन्दू धर्मीय आपले घर व दुकाण सजवतात आणी लाईटींग करतात तसे मुस्लिम कुटूंबिय ही करतात. तसेच नवनवे वस्ञ,शुज हे ही खरेदी करतात.यामुळे "खुदबा" म्हणजे मुस्लिमांचा "दिवाळी" सारखाच सण असतो.आणि हा सण दि.३१ मार्च रोजी मोठ्या उत्सहात,आनंदात या भागात संपन्न झाला.
यावेळी पै-पाहुने,ईष्ठमिञं यांना आमंञण देऊन "शिरर्खुमा,गोडभजे" आदी पदार्थांची मेजवानी देण्यात आली.एकंदरीत दरवर्षीसारखा यंदा ही "खुदबा" आनंदात संपन्न झाला..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या