Ticker

6/recent/ticker-posts

14 एप्रिल या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर या ज्ञानाच्या अथांग महासागराची जयंती आहे .


विजय चौडेकर नांदेड जिल्हा प्रतिनिधी चित्रा न्यूज 

अभ्यासाचा व्यासंग आणि ज्ञानसाधनेच्या बळावर मनुष्य जीवना मध्ये किती उत्तूंग झेप घेवू शकतो याचे मूर्तीमंत प्रतीक म्हणजे डॉ . बाबासाहेब आंबेडकर .. त्यामूळेच डॉ. बाबासाहेबांची symbol of knowledge म्हणून ख्याती आहे . पुस्तकांवर जिवापाड प्रेम करणारा आणि पुस्तकांसाठी घर बांधणारा हा महामानव आहे . भारतीय राज्यघटनेचा शिल्पकार, दीन दुबळ्यांचा आधारवड, वंचित आणि शोषीतांचा उद्धारकर्ता, अस्पृश्यांचा कैवारी, विद्याव्यासंगी विद्वान, बहूजनांचा मार्गदर्शक नेता, सामाजिक समतेचा पुरस्कर्ता , वाचनप्रेमी लोकनेता अशी कितीतरी रूपे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तीमत्वाची सांगता येतील . डॉ. बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांना शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा तसेच शासनकर्ती जमात बना असा बहूमोल संदेश दिला . डॉ. बाबासाहेबांचा जन्म 14 एप्रिल 1891 या दिवशी झाला . त्यांचे महापरिनिर्वाण 6 डिसेंबर 1956 या दिवशी झाले . बाबासाहेबांना त्यांच्या अंगी असलेल्या तेजस्वी बुद्धीमत्तेमुळे जागतीक स्तरावर किर्ती प्राप्त झाली . जयंतीनिमित्त डॉ . बाबासाहेब आंबेडकर या ज्ञान सूर्याला मी विनम्र अभिवादन करतो . . .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या