सोलापूर :- जिल्ह्यात काही ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती मिळत आहे. सकाळी 6.22 वाजता काही ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. कर्नाटकतील विजापूरपासून 10 किलोमीटर अंतरावर भूकंपाचं केंद्रबिंदू आहे. त्याठिकाणी भूकंपाची तीव्रता 4.6 रिश्टर स्केल इतकी होती. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यातील गावात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. याबाबत माहिती मिळाल्यावर एबीपी माझानं सोलापूर जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला. त्यावेळी सोलापूर जिल्हा प्रशासनानं या बातमीला दुजोरा दिला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील काही भागात आज सकाळी भुकंपाचे सौम्य धक्के जाणवले. सकाळी साडे सहाच्या सुमारास हे भुकंपाचे धक्के जाणवल्याच्या माहिती नागरिकांनी दिली. सोलापूर शहरासह मंगळवेढा, सांगोला, पंढरपुरातील काही भागात भुकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती नागरिकांनी दिली. या माहितीस आता प्रशासनाने देखील दुजोरा दिला आहे.
कर्नाटकातील विजयापूरपासून 10 किलोमीटर अंतरावर भूकंपाचं केंद्र असून सकाळी 6.22 मिनीटांनी धक्के बसले असल्याची माहिती सोलापूर जिल्हा प्रशासनानं दिली आहे. भूकंपाची तीव्रता 4.6 रेक्टर स्केल असून 10 किमी इतकी डेप्थ असल्याची माहीती देखील प्रशासनाने दिलीय. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील काही भागांत देखील याचे परिणाम जाणवले आहेत. मात्र भूकंपाची तीव्रता अतिशय कमी असल्यानं कोणतीही हानी यामध्ये झाली नसल्याचे स्पष्टीकरण देखील प्रशासनानं दिलं आहे
0 टिप्पण्या