Ticker

6/recent/ticker-posts

जलव्यवस्थापन उपक्रमांना विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी संदेशाद्वारे दिल्या शुभेच्छा


चित्रा न्युज प्रतिनिधी 
अहिल्यानगर :- नागरिकांना पाण्याच्या बचतीचे महत्व पटवून देण्याबरोबरच जलसाक्षरता वाढीसाठी जिल्ह्यात जलव्यवस्थापन कृती पंधरवडा राबविण्यात येत असुन या उपक्रमांतर्गत कर्जत व जामखेड येथे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी संवाद मेळाव्यास महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या. 

कुकडी वसाहत कोळवडी बैठक हॅाल येथे मार्गदर्शपर शिबीर संपन्न झाले. शिबीरात पाणी व्यवस्थापन,पीकनिवड, कीड नियंत्रण,उत्पादकता वाढ या विषयांवर तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन करण्यात आले. 

 राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतुन जलव्यवस्थापन कृती पंधरवड्यात संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. या पंधरवड्यात जलसंपदा आपले गावी,भुसंपादन शिबिर,स्वच्छ माझे कार्यालय, कालवा स्वच्छता यासह इतर उपक्रम राबविण्यात येत आहेत. ३० एप्रिलपर्यंत सुरु राहणारे हे उपक्रम यशस्वीपणे राबविण्याचे आवाहन करीत  या उपक्रमासाठी  प्रा.  शिंदे यांनी आपल्या संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या.   
*******

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या