Ticker

6/recent/ticker-posts

दहिगाव येथील खोटे गुन्हे रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची गृहमंत्र्यांकडे मागणी!


चित्रा न्युज प्रतिनिधी 
अकोला : दहिगाव तालुका तेल्हारा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त गावाच्या कमानीवर लावलेल्या पंचशील व निळे झेंड्याची विटंबना गावातील काही जातीवादी वृत्तीच्या लोकांनी केली. त्यानंतर गावातील आंबेडकरवादी मंडळींनी तेल्हारा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. तक्रार दाखल झाल्यानंतर तक्रार दाखल करण्याचा राग मनात ठेवून जातीवादी प्रवृत्तीच्या काही लोकांनी तक्रार दाखल करणाऱ्या दही गावातील आंबेडकरवादी मंडळींवर राजकीय दबावातून खोट्या तक्रार दाखल केली.

दहिगाव येथे तेल्हारा पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवून तेल्हारा पोलिसांनी कोणतीही चौकशी न करता खोटे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले. ही बाब गंभीर असून जातीयवादी मानसिकतेतून हा प्रकार झाल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडी पदाधिकाऱ्यांनी निवेदनामार्फत गृहमंत्री व अकोला एसपी यांच्यापुढे मांडली आहे. अजून सुद्धा दहिगाव येथील आंबेडकरवादी सामान्य मंडळीवर राजकीय दबावातून तेल्हारा पोलीस मार्फत खोटे गुन्हे दाखल करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज सुद्धा दहीगावातील जनता भयभीत झालेली आहे.
वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्यावतीने गृहमंत्री तसेच अकोला पोलीस अधीक्षक यांना दहिगाव तालुका तेल्हारा येथील आंबेडकरवादी मंडळीवर दाखल केलेले सर्व गंभीर स्वरूपाचे खोटे गुन्हे त्वरित रद्द करण्यात यावे, तसेच तेल्हारा पोलीसांचे दहिगाव येथील कोंबिंग ऑपरेशन तात्काळ थांबून तेल्हारा पोलिसांनी राजकीय दबावातून कोणतेही खोटे गुन्हे आंबेडकरवादी मंडळींवर दाखल करण्यात येऊ नये.  आंबेडकरवादी मंडळींवरील तेल्हारा पोलिसांनी दाखल केलेल्या सर्व खोट्या गुन्ह्यांची पोलीस अधीक्षकमार्फत चौकशी समिती स्थापन करून चौकशी करून खोटे गुन्हे तात्काळ रद्द करण्यात यावी. व खोटे गुन्हे दाखल करणारे पोलीस अधिकारी यांना तात्काळ निलंबित करून खोटे गुन्हे दाखल करणारे दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अन्यथा वंचित बहुजन आघाडी तेल्हारा पोलिसांविरुद्ध तीव्र आंदोलन करेल अशी मागणी वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे व जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे यांनी गृहमंत्री व अकोला पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली.

यावेळी महिला आघाडी अध्यक्ष आम्रपाली खंडारे, माजी जि.प. अध्यक्ष संगीता अढाऊ, गजानन गवई, मनोहर बनसोड, किशोर जामनिक, अक्षय तायडे, राजू मुंधवने, अमोल कलोरे, शंकरराव राजुस्कर सह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

#PrabuddhBharat

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या