अकोला :-भीमा कोरेगाव विजयस्तंभ विकासासाठी सरकार अनेक वेळा निधीची घोषणा करीत असले तरी भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण व जागेचा मालकी हक्क हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याने कसलाही विकास करता येणार नाही ही खरी वस्तुस्थिती आहे,प्रथम न्यायालयाचा खटला जिंकणे ही आपली सर्वांची पहिली आणि सामुहिक जबाबदारी आहे.भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण व जागेचा मालकी हक्क हा प्रशासकीय व न्यायालयीन लढा प्रत्येक गावात, शहरात,तालुक्यात,जिल्ह्यात,राज्यात व राष्ट्रीय पातळीवर जनजागृती करण्यासाठी समाजभिमुख व्हावा म्हणून जनजागृती अभियान राबवण्यात येणार आहे.न्यायालयाचा खटला गतिमान व्हावा आणि लवकरात लवकर निकाल लागावा म्हणून या लढ्यात सर्वांनी सहभागी व्हावे म्हणून गेल्या अनेक वर्षापासून मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते आणि थोर विचारवंत दादाभाऊ अभंग हे लढा देत असून त्यांनी कोरेगाव भीमा विजयस्तंभ बचाव समितीची स्थापना केलेली आहे या कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीच्या महाराष्ट्र प्रदेश महासचिव या पदावर त्यांनी सामाजिक कार्यकर्ते,आंबेडकरी चळवळीत निष्ठेने काम करणारे,शैक्षणिक तसेच मंत्रालयीन स्तरावर अनुभव असणारे अकोल्यातील प्रविण भोटकर यांच्या नियुक्तीची नुकतीच घोषणा केली आहे,प्रदेश महासचिव तसेच अकोला जिल्हा प्रभारी पदाची जबाबदारी सुद्धा प्रवीण भोटकर यांच्यावर देण्यात आली आहे,प्रवीण भोटकर यांनी मंत्रालयात भारतरत्न,संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र लावण्याचा ऐतिहासिक असा लढा लढून मंत्रालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र मोठ्या दिमाखात आणि भव्य दिव्य पद्धतीने लावण्याचा भीम पराक्रम केला आहे,तसेच महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक संघटनेच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी विविध आरोग्य आणि रक्तदान शिबिरे आयोजित करून सर्वसामान्य आणि गोरगरीब रुग्णांना शासन आणि विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून भरघोस आर्थिक मदत मिळवून देण्याचे महत्कार्य अविरत सुरू ठेवले आहे.भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण न्यायालयीन लढ्यात ते सुरुवातीपासून सहभागी आहेत.या ऐतिहासिक न्यायालयीन लढ्यात प्रविण भोटकर जनजागृतीचे काम तन,मन,धन आणि आपले सर्वस्व लावून करतील अशी अपेक्षा समितीचे महाराष्ट्र अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांनी व्यक्त करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत,प्रवीण भोटकर यांची कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीच्या महाराष्ट्र प्रदेश महासचिव आणि अकोला जिल्हा प्रभारी पदावर नियुक्ती झाल्या बद्दल त्यांच्यावर सर्वच स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे ...
0 टिप्पण्या