चित्रा न्युज प्रतिनिधी
कोल्हापूर : मेंढपाळ व्यवसाय असणाऱ्या कुटुंबातील बिरदेव डोने याने तिसऱ्या प्रयत्नात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत आय.पी.एस. पदाला गवसणी घातली आहे.
कागल तालुक्यातील बमगे गावच्या बिरदेव सिद्धाप्पा डोणे याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात 551 वी रैंक मिळवत अतुलनीय यश संपादन केले आहे.
बिरदेव दोन खोलीच्या घरात जागा नसल्याने व्हरांड्यात अभ्यास करायचा, जिकडे शेळ्या मेंढ्या घेऊन जाईल तिकडे अभ्यास करायचा. जेव्हा निकाल आला, त्यावेळी बिरदेव शेळ्या चारत होता.
त्याच्या या यशाने अनेकांना प्रेरणा मिळेल.
0 टिप्पण्या