Ticker

6/recent/ticker-posts

बांधकाम कामगारांना मोफत शासकीय योजना मिळत आहेत, त्यामध्ये 70%,ते 80%लाभार्थी बोगस, चौकशी करावी,, विजय चौडेकर, सामाजिक कार्यकर्ता,


विजय चौडेकर नांदेड जिल्हा प्रतिनिधी चित्रा न्यूज 

नांदेड -बांधकाम कामगारांना शासकीय योजना मिळत आहेत, ज्या मध्ये, गवंडी, सुतार, लोहार, प्लंबर,पेंटर,व इतर, यांना जसे की बांधकाम साहित्य, संसार उपयोगी भांडी घरबांधणी साठि 5 ते 6,लाख रु, कच्चे घरं जोडणीसाठी, त्यांच्या मुलांना शिक्षणात सवलत, लग्न केल्याने खर्च दिला जातो, बांधकामावर मृत्यू झाला, विमा मिळतो,असेच बरेचं मोफत फायदे दिले जात आहे त,ऐवढे फायदे मोफत या बांधकाम योजना मध्ये मिळतं आहेत तर किती लाभार्थी बोगस असतील याचा विचार शासनाने कधी कधी केला नाही शासकीय योजनाचा थोडासा फायदा होत असेल तिथे तर बोगस लोकांची गर्दी होते, या योजने मध्ये अनेक फायदे आहेत,आणखी वर साठ वर्षांनंतर, पेन्शन, मानधन म्हणू, मिळतें तर प्रत्येक घरात एक बांधकाम मजूर तयार होणारच त्यामध्ये बांधकाम गुत्तेदार झाला मालामाल तिनं हजार ते पाच हजार रु घेऊन एक वर्ष काम केलेलं प्रमाणपत्र देण्यात येतं आहे, हजारोंच्या संख्येने असे प्रमाणपत्र तयार करून वाटण्यात आले, किती आर्थिक व्यवहार झाला असेल विचार केलेला न बरा  
आणि हे बोगस लाभार्थी कामगार संघटना चे नातेवाईक, नगरसेवक, आमदार, खासदार, पदाधिकारी, यांच्या संबंधातील जास्त प्रमाणात आहेत असे जनतेचे मत आहे, आणि या मध्ये काही चूकिचे नाही असे वाटते शासनाचे किती आर्थिक नुकसान होत असेल,हे बोगस लाभार्थी कशी शासनाची लुट करत आहेत,याची कधी कोणत्या मिडिया ने दखल घेतली नाही, किंवा आत्ता पर्यंत शासकीय अधिकाऱ्यांच्या कधी निदर्शनास आले नाही, सरकारने कधी विचार केला नाही,हे अजबच वाटते आणि महत्त्वाची बाब जे खरे लाभार्थी आहेत, अत्यंत गरिब परिस्थितीत जिवन जगत आहेत, त्यांना या योजनेची खरी गरज आहे, त्यांना काहीच नाही आणि हे सत्य आहे, आणि हि दुर्दैवी बाब आहे,शासनाची कोणतीही योजना असो धनदांडगे च लाभ उचलताना दिसतं असतात खरे लाभार्थी बाजूलाच राहातात कारणं खरं असो किंवा खोट, चिरीमिरी ,सरळ भाषेत रिश्वत देल्या शिवाय कामच होत नाही आणि मेन मुद्दा खर्या लाभार्थींना पैसे द्यावे वाटतं नाही, आणि बिगर पैश्या शिवाय कामं होत नाही म्हणून खरे लाभार्थी कोणत्याही शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहतात त्यामुळे शासन स्तरावर गांभीर्याने विचार करावा आणि प्रत्येक शासकीय योजनाचा वापर कशा प्रकारे होत आहे याची चौकशी करून अशा भ्रष्टाचारी लोकांवर व बोगस लाभार्थ्यांवर कडक कारवाई करावी,, त्यामुळे अशा लोकांवर थोडासा वचक निर्माण होईल, विजय चौडेकर, सामाजिक कार्यकर्ता, पत्रकार,मो,9529944770

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या