चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर :-शासनमान्य किरकोळ देशी दारु विक्रीचे हाळी {ता.उदगीर} येथील दुकाण भल्या पहाटे पाच , साडेपाच वाजता उघते.तसेच किरकोळ विक्री च्या या दुकाणातून परिसरातील अवैध दारु विक्रेत्यांना रोज पंधरा ते वीस बाॅक्स दारुची विक्री केली जाते आणि याची सविस्तर माहिती असून तसेच देऊन सुध्दा संबंधित खात्याचे अधिकारी महाशय कार्यवाही करत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते. म्हणुन दारुबंदी अधिकारी कोमात आणि हाळीचा देशी दारु दुकाणदार जोमात.असे म्हणने चुक ठरु नये..!
हाळी येथे शासनमान्य किरकोळ देशीदारु विक्रीचे दुकाण आहे.आणि हा दुकाणदार शासननियम सर्रासपणे पायदळी तुडवीत असल्याचे सामान्य जनतेला दिसते.परंतू संबंधित दारु बंदी अधिका-याला दिसत कसे नाही?
*मान्यता किरकोळ विक्रीची* तरी ही या परिसरातील अवैध दारु विक्री करणा-यांना रोज 15ते20 बाॅक्स / पेट्या विकले जातात.वडगाव,वडगाव तंडा,अजनसोंडा,सुकणी,मोरतळवाडी, येथील अनेक अवैध दारु विक्रेते हे आपापल्या वाहनाद्वारे देशी दारुच्या पेट्या आपापल्या गावी बिनधास्त घेऊन जातात.तेंव्हा किरकोळ विक्रीचा परवाना असलेल्या हाळी येथील विक्रेत्याला ठोक मध्ये पेट्याच्यापेट्या माल विकता येतो का?
*भल्या पहाटे उघडते दुकाण*
राज्यमार्गालगत शासनमान्य देशी दारु विक्रीचे दुकाण आहे.आणि हे दुकाण सुरु झाले तेंव्हापासुन शासन नियम पायदळी तुडविण्याचे काम दारुबंदी अधिका-याला आपलेसे करुन हा दुकाणदार करतोय.असे म्हणणे चूक ठरणार नाही.कारण जेंव्हा पासून हे दुकाण सुरु झालेय तेंव्हा पासून भल्या पहाटे 5.30 ते 6 वा.दरम्यान हे दुकाण उघडले जाते, आणि राञी 11ते11.15 वा.बंद केले जाते. आणि याची माहिती असूनही व प्रत्यक्षात भेटून देऊनही उदगीरचे दारु बंदी अधिकारी 'खाऊन-पिऊन' याकडे दुर्लक्ष करतात.म्हणे..!
*या दुकाणाविरुध्द फोनवरुन अनेकांनी तक्रार केल्या आहेत.तसेच वरील सर्व बाबींची शहानिशा करुन कारवाई करण्यात येईल,अशी माहिती रमेश चाटे,निरीक्षक,रा.उ.शुल्क विभाग,उदगीर यांनी दिली आहे*
0 टिप्पण्या