Ticker

6/recent/ticker-posts

हिमायतनगर शहरातील मुख्य रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे रुग्णवाहिकेस काढावी लागत आहे ह्यातून वाट.....




 नगरपंचायतच्या नाकर्तेपणामुळे शहरातील आठवडी बाजार मुख्य रस्त्यावर भरवला जात आहे..

आठवडी बाजारच्या दिवशी ठिकठिकाणी वाहतूक ठप्प.....

- पोलीस व महसूल प्रशासन याकडे लक्ष देणार का ?


लिंगोजी कदम  जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण नांदेड
नांदेड :-हिमायतनगर हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे येथे दर बुधवारी आठवडी बाजार भरवला जात तो, हा आठवणी बाजार नगरपंचायतने ठरवून दिलेल्या ठिकाणी न भरवता शहरातील मुख्य रस्त्याने भरवला जात आहे या सर्व बाबीकडे नगरपंचायत प्रशासन मात्र साफ दुर्लक्ष करत आहे हिमायतनगर शहराच्या मध्यभागी असलेल्या ग्रामीण रुग्णालयांमध्ये अति गंभीर रुग्ण दररोज या ठिकाणी येतात या रुग्णांना नांदेड सारख्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी येणाऱ्या रुग्णवाहिकेस मात्र  रस्त्यावर वाढलेल्या अतिक्रमणातून वाट काढावी लागत आहे तरी पण मुख्य रस्त्यावरील भाजीपाल्याचे गाडे व ठेल्या मुळे शहरातील मुख्य रस्त्यावर वाहतूक मात्र तासान तास ताटकळत असल्यामुळे शहरात येणाऱ्या रुग्णवाहिकेस  रस्ता काही मिळेना त्यामुळे अति गंभीर रुग्णांना नांदेड सारख्या ठिकाणी वेळेवर पोहोचता येत नाही या सर्व बाबीकडे स्थानिक पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन लक्ष देऊन रस्त्यावरील अतिक्रमण मोकळे करून देण्याची मागणी शहरातील सुजाण नागरिकांतून होत आहे ...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या