चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर - वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर व जिल्ह्याच्यावतीने महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य डॉ. नितीन ढेपे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. येणाऱ्या 9 मे रोजी सोलापूर जिल्हा परिषद पुनम गेट येथे आंदोलन घेण्याचा ठराव या बैठकीत करण्यात आला.
तत्पूर्वी आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर व जिल्ह्याच्यावतीने अभिवादन करण्यात आला.
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतीय पर्यटकांचा मृत्यूची झाला होता. केंद्र सरकार दोन आठवडे उलटून गेले तरी पाकिस्तान दहशतवादी यांच्यावर कारवाई करीत नाही. जनता मागणी करत आहे, कारवाई करायला सरकार कचखाऊपणा करत असून जनता खंबीर, नेता बधिर आणि विषय गंभीर, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणून देशातील जनतेची मागणी आहे या दहशतवादी पाकिस्तानला धडा शिकवावा.
याचाच एक भाग म्हणून येणाऱ्या 9 मे ला एक भारतीय म्हणून आंदोलन करून पाकिस्तानला धडा शिकवा, अशा प्रकारची मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय कार्यकारणी सदस्य नितीन ढेपे यांनी दिली.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सन्माननीय, डॉक्टर नितीन ढेपे, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे, अनिरुद्ध वाघमारे, प्रशांत गोणेवार, विनोद इंगळे, नानासाहेब कदम, आतिश बनसोडे , विक्रांत गायकवाड , शंकर शिंदे , सुरेश देशमुख , दीपक माने, धीरज कसबे, अशोक माने, वैभव भंडारे, अजय गाडे, रवी थोरात, विजयानंद उघडे, जगदाळे विवेक गजशिवे, रवी पोटे, विशाल ठोंबरे, बबन गायकवाड, यशवंत इंगळे, अशोक माने, वैभव भंडारे, वाघमारे ताई, रोहित लालसरे, बाबू बनसोडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या