Ticker

6/recent/ticker-posts

मध्यप्रदेश सिमालगत गांवात लाखों बोगस मतदार; मतदान यादीतून नावे कमी करण्याची बिरसा फायटर्सची मागणी

तहसीलदार शिरपूर यांना बिरसा फायटर्सचे निवेदन

चित्रा न्युज प्रतिनिधी 
शिरपूर :-शिरपूर तालुक्यातील मालकातर, मिटगांव, मालपूरपाडा इत्यादी मध्यप्रदेश सिमालगत गांवातील मध्यप्रदेश मधील बोगस मतदारांची चौकशी करून मतदार यादीतून  नावे कमी करा,अशी मागणी बिरसा फायटर्स तालुका शाखा शिरपूर संघटनेकडून तहसीलदार शिरपूर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्याध्यक्ष गोपाल भंडारी,तालुकाध्यक्ष नरेंद्र पावरा,उपाध्यक्ष रवींद्र  पावरा,कार्याध्यक्ष विजय पावरा,सचिव शरद पावरा,सहसचिव दिनेश पावरा,प्रसिद्धीप्रमुख पवन सोलंकी आदि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
                     शिरपूर तालुक्यात मालकातर, मिटगांव, मालपूरपाडा अशा मध्यप्रदेश सिमालगत गांवात मध्यप्रदेश मधील बोगस मतदार मोठ्या प्रमाणात असून महाराष्ट्र राज्यातील शिरपूर तालुक्यातील गांवातील मतदार यादीत त्यांची  नावे समाविष्ट असून हे बोगस मतदार मध्यप्रदेश व महाराष्ट्रात दोन्ही ठिकाणी मतदान करतात. या बोगस मतदारांच्या मतदानामुळे देशात व महाराष्ट्रात होणा-या ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा  व लोकसभा अशा सर्वच निवडणुकीच्या निकालावर परिणाम होत आहे.अशा बोगस मतदारांमुळे अयोग्य उमेदवार निवडून येत आहेत. हे लोकशाहीसाठी घातक आहे. मध्यप्रदेश व महाराष्ट्रात अशा दोन्ही राज्यात मतदार करून अशे मतदार हे  निवडणूक आयोगाची व देशाची फसवणूक करीत आहेत. म्हणून शिरपूर तालुक्यातील मालकातर, मिटगांव, मालपूरपाडा अशा मध्यप्रदेश राज्यातील सिमालगत गांवात असणा-या बोगस मतदारांची सखोल चौकशी करून त्यांची मतदान यादीतून नावे कमी करण्यात यावीत व बोगस मतदारांवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी,अशी मागणी बिरसा फायटर्स शिरपूर संघटनेकडून तहसीलदार शिरपूर यांच्याकडे करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या