Ticker

6/recent/ticker-posts

शिक्षक घोटाळा प्रकरणातील व्यक्तींची संपत्ती जप्त करा तसेच फाशीची शिक्षा द्या....

चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा :-नागपूर भंडारा गोंदिया तसेच संपूर्ण महाराष्ट्रात झालेल्या बनावट शालार्थ आयडिया तयार करून बोगस शिक्षक भरती घोटाळ्यातील व्यक्तीची संपत्ती जप्त करून अशा व्यक्तींना फाशीची देण्यात यावी.असे निवेदन अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समिती जिल्हा भंडारा जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर भिवगडे, कार्याध्यक्ष विष्णुदास लोणारे, सचिव पुरुषोत्तम गायधने यांनी निवासी जिल्हाधिकारी स्मिता बेलपात्रे यांचे मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई यांना आज दिनांक 26 5 2025 रोजी पाठविले आहे संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेल्या बनावट शालार्थी शिक्षण विभागातील शिक्षक घोटाळ्यात अनेक लोकांनी बोगस शिक्षक भरती करून अनेकांचे जीवन उध्वस्त केले व अनेकांची फसवणूक करून अमाप संपत्ती जमा केली. तसेच बोगस शिक्षकांच्या नावाने वेतन काढून शेकडो कोटी शासकीय निधीचा अपहार करण्यात आला आहे. हीअत्यंत निंदनीय बाब आहे. त्यामुळे या घटनेचा संघटनेच्या वतीने निषेध करण्यात येत आहे. अशा शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचारी व बोगस आयडिया बनून शासनाची व जनतेची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीची संपत्ती  शासन दरबारी जमा करून अशा व्यक्तींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समिती जिल्हा भंडाराच्या वतीने करण्यात आली. यावेळी कोठीराम पवनकर, दशरथ शहारे, आदित्य मेश्राम तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या