Ticker

6/recent/ticker-posts

वंचित बहुजन आघाडीच्यावतीने माजी सैनिकांचा सन्मान !

चित्रा न्युज प्रतिनिधी 
रायगड : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त 10 मे रोजी राज्यभर विविध कार्यक्रम राबविले जात असतात परंतु, बाळासाहेब आंबेडकर यांनी यावर्षी भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करण्याचे जाहीर केले होते. यानिमित्ताने तिरंगा रॅली, रक्तदान शिबीर घेण्याचे आवाहन त्यांनी केले होते.

वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्हा उत्तर अंतर्गत खोपोली शहराच्यावतीने पहलगाम हल्ल्याचे चोख उत्तर देणाऱ्या भारतीय सेनेचे अभिनंदन करण्याकरिता तसेच युद्धजन्य परिस्थितीत आम्ही देशसोबत आहोत, भारतीय सेनेसोबत आहोत या उद्देशाने तिरंगा झेंड्याखाली एकत्रित येत आपल्या जीवनातीन बहुमूल्य योगदान देशासाठी देणाऱ्या आणि प्रत्यक्ष युद्ध लढलेल्या माजी युद्धवीरांचा आणि माजी सैनिकांचा सन्मान सोहळा वंचित बहुजन आघाडी खोपोली शहर-रायगडच्यावतीने आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस हल्ल्यात शहीद झालेल्या शूरवीरांना श्रद्धांजली वाहून आपल्या काळात लढलेल्या युद्धजन्य परिस्थितीची माहिती यावेळी युद्धविरांनी आपल्या मनोगतातून सांगितली. यामध्ये युद्धवीर प्रकाश महाडिक, युद्धवीर रामकांत मोदी, युद्धवीर विष्णू कांबळे (मोरे), युद्धवीर सुरेश पिंगळे, पॅरा कमांडो राहुल भिसे, भारतीय वायू सैनिक भरत काकडे, कमांडो संजय वाघमारे, कमांडो शरद विचारे, माजी सैनिक सिद्धार्थ वाघमारे या माजी युद्धविरांचा आणि माजी सैनिकांचा सन्मान सोहळा संपन्न झाला.

सदर कार्यक्रम रायगड जिल्हा अध्यक्ष दिपकभाऊ गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली खोपोली शहर अध्यक्ष सुमित जाधव आणि शहर कमिटीमार्फत पार पडला. यावेळी संतोष मर्चंडे, कुणाल पवार, प्रफुल कदम, मिताली वाघमारे, प्रशाली मोरे, ज्ञानेश्वर गायकवाड, ऑडिटर संदीप गाडे, महिला खोपोली शहर अध्यक्षा प्रमिला गायकवाड, सुवर्णा वाघमारे, भाऊसाहेब पोळ, प्रकाश गायकवाड यांच्यासह शहरातील शाखेतील पदाधिकारी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या