चित्रा न्युज प्रतिनिधी
अकोला - पहेलगाव हल्ल्याचे प्रती उत्तर म्हणून भारतीय सैन्याने "ऑपरेशन सिंदूर" राबवत पाकिस्तानातील 9 दहशतवादी ठिकाण्यावर मध्यरात्री हल्ला करून अनेक दहशतवाद्यांचा खतमा करत बदला घेतला. जम्मू काश्मीरमधील पहेलगाव हल्ल्यात अनेक भारतीय पर्यटकांची पाकिस्तानी दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून निघृण हत्या केली होती.
या भ्याड हल्ल्याने संपूर्ण भारत देशात दुःखाचा डोंगर कोसळला होता. भारतीय सैन्याने शौर्य गाजवत ऑपरेशन सिंदूर राबवल्यामुळे संपूर्ण देशाला आनंद झाला आहे. त्यामुळे "ऑपरेशन सिंदूर" चा वंचित बहुजन आघाडीच्यावतीने मलकापूर चौक, अकोला येथे आज फटाके फोडून व नागरिकांना पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला.
यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या माजी नगरसेविका किरणताई बोराखडे, माजी जि. प. उपाध्यक्ष दामोदर जगताप, महिला महानगर महासचिव सुवर्णाताई जाधव, माजी जिल्हा प्रसिध्दी प्रमुख विकास सदांशिव, बाबाराव दंदी, किशोर तेलगोटे, प्रकाश वानखडे, डि. जी. तायडे, मायाताई इंगळे, छायाताई वानखडे, कविताताई डोंगरे, मिनाताई सरदार, कविताताई लाड, नम्रताताई वाहुरवाघ, वैशालीताई इंगोले, विमलताई खंडारे, आकाश गोपनारायण, संतोष भालेराव, सेवानंद इंगळे, गजानन येवतकार, देवानंद इंगळे, अंकुश इंगळे, अशोक खडसे, उत्तम मोरे, राजेश गोपनारायण, पुरूषोत्तम वानखडे, सिध्दार्थ वानखडे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या