बिरसा फायटर्सच्या तक्रारीनंतर पोलिसांकडून पैसे वापस!
चित्रा न्युज प्रतिनिधी
शिरपूर :- MH-41V2228 या बोलेरो गाडीतून गाडी तपासणीच्या निमित्ताने जबरदस्तीने ९७००० रूपये काढून घेऊन आमची लूटमार करणा-या,पैसे परत मागितल्यास खोट्या गुन्ह्य़ात अडकवून अटक करण्याची धमकी देणा-या,आम्हाला लाथा बुक्यांनी मारहाण करणा-या सांगवी पोलीस ठाण्यातील पोलीस श्री.शेखर बागूल S.T.P.S व सोबत ड्यूटीवर असणा-या(१ पोलीस) पोलिसांवर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करणेबाबत व आमचे पैसे आम्हाला परत मिळावेत, अशा मागणीचे निवेदन बिरसा फायटर्स शिरपूर संघटनेकडून पोलीस अधीक्षक धुळे,उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपूर व पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे सांगवी यांना देण्यात आले.
श्री. पिंट्या नारसिंग पावरा (पायाचा रुग्ण),श्री.कैलास तेजला पावरा-दोन्ही राहणार खरवड ता.धडगांव जि.नंदुरबार व श्री. भूषण गुलाबसिंग पावरा ड्रायव्हर राहणार मुंगबारी ता.धडगांव जि.नंदुरबार हे MH-41 V 2228 या गाडीने(श्री. पिंट्या नारसिंग पावरा गाडी मालक व पायाचा रूग्ण) आपल्या खरवड- मुंगबारी हे नाशिक हून धुळे सोनगिर-सांगवी महामार्गाने उज्जेन येथे महाकाल मंदिर येथे दर्शनास जात असतांना महामार्गावर ड्यूटीवर असणारे सांगवी पोलीस ठाण्यातील पोलीस श्री.शेखर बागूल S.T.P.S. व सोबतच्या १ पोलिसांनी दिनांक १२/०५/२०२५ रोजी पहाटे २.००(2.00,AM) वाजता आमची MH-41V2228 बोलेरो गाडी सांगवी ते शिरपूर दरम्यान -मध्यभागी तपासणीसाठी अडवली,एवढ्या रात्री तुम्ही कुठे जात आहे?असे आम्हाला विचारल्यानंतर आम्ही उज्जेन येथे देवदर्शनास जात आहे,असे पोलिसांना सांगितले.गाडी तपासणी दरम्यान श्री. शेखर बागूल पोलीस यांनी आमच्या गाडीतील डिक्कीतून ( पेटीतून) आम्ही रूमालात गुंडाळून ठेवलेले ९७००० रूपये आमच्या देखत काढून घेतले.आमच्याकडे डिझेल साठी पैसे नाहीत, म्हणून पोलिसाने आमच्याच पैशांतून ७००० रूपये आम्हाला डिजेल साठी काढून दिले व ९०००० रूपये त्यांचेकडे ठेवून घेतले.तक्रादाराचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर बिरसा फायटर्स शिरपूर संघटनेकडून पोलीस अधीक्षक धुळे ,पोलीस उपविभागीय अधिकारी शिरपूर यांच्याकडे एका निवेदन देण्यात आले.त्यानंतर सांगवी पोलिसांनी मूळ तक्रारदारास पैसे परत करण्यात आले.सांगवी पोलीस ठाण्यातील काही पोलीस अशाच पद्धतीने प्रवांशांची कायम लूटमार करतात,हे सामान्य जनतेला लुटणारे पोलीस आहेत की चोर आहेत ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
0 टिप्पण्या