काम अपूर्ण;पूर्ण निधी हडप केल्याचा तत्कालीन सरपंचांवर आरोप
चित्रा न्युज प्रतिनिधी
शिरपूर :- जोयदा तालुका शिरपूर जिल्हा धुळे येथे वर्ष २००९-२०१० किंवा २०१०-२०११ या वर्षात 'मानव विकास कार्यक्रम' अंतर्गत अपूर्ण बांधकाम करून संपूर्ण निधी हडप झालेल्या अंगणवाडी इमारतीची सखोल चौकशी करून दोषिंवर फौजदारी गुन्हा दाखल करून निधी वसूल करा,अशी मागणी बिरसा फायटर्स शिरपूर शाखा संघटनेकडून गटविकास अधिकारी पंचायत समिती शिरपूर व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्याध्यक्ष गोपाल भंडारी,तालुकाध्यक्ष नरेंद्र पावरा,उपाध्यक्ष रवींद्र पावरा,कार्याध्यक्ष विजय पावरा,सचिव शरद पावरा,सहसचिव दिनेश पावरा,प्रसिद्धीप्रमुख पवन सोलंकी आदि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
जोयदा येथील पडक्या व अपूर्ण अंगणवाडी इमारतीची चौकशी करा म्हणून काही तक्रारदारांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे,जिल्हाधिकारी धुळे,सभापती महिला व बाल विकास धुळे,उप मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे कार्यकारी अभियंता उत्तर विभाग धुळे यांना निवेदन दिली आहेत.परंतू पडक्या इमारतीची चौकशी करण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात आहे.जोयदा या गावात विषयांकित वर्षान्वये 'मानव विकास कार्यक्रम' अंतर्गत अंगणवाडी इमारतीचे सुरू करण्यात आले. परंतू आजही सदर इमारतीचे संपूर्ण बांधकाम अत्यंत निकृष्ट आणि अर्धवट /अपूर्णावस्थेत आहे. तर संपूर्ण पैसा लाटला गेला असल्याची दाट शक्यता आहे. त्यामुळेच अंगणवाडी क्रमांक ४ मधील लहान बालकांवर एका खासगी घरात बसण्याची वेळ आलेली आहे.
गावातील अपूर्ण बांधकाम झालेल्या आणि बील लाटले गेलेल्या अंगणवाडी इमारतीची सखोल चौकशी करून दोषिंवर फौजदारी गुन्हा दाखल करावा. आणि बांधकाम न करता हडप केलेला निधी वसूल करण्यात यावा. अन्यथा जिल्हा परिषद धुळे समोर बिरसा फायटर्स संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून प्रशासनास देण्यात आला आहे.ौ बरोबर
0 टिप्पण्या