चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर :-दि.६ जून रोजी उदगीर तालुक्यातील हंडरगुळी व वाढवणा खुर्द या गावात छञपती श्री.शिवाजी महाराज यांचा ३५१ वा.राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला.
हंडरगुळी येथे ग्रा.पं.समोर भगव्या ध्वजाची गुढी उभारुन शिवाजी राजे भोसले यांचा ३५१ वा.राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला.
सरपंच विजय अंबेकर,उपसरपंच बालाजी भो.पाटील,ग्रा.वि.अधिकारी एस.आर.कांबळे,माजी सरपंच शेख मगदूमसाब,जेष्ठ पञकार विठ्ठल पाटील,सदस्य सुनिल कांबळे,अंकूश अनलदास,सुकणे सर,चिंतलवार बी. गुडसुरे दयानंद,माधव अंबेकर यांच्या हस्ते भगव्या गुढीची विधिवत पुजा करण्यात आली.
वाढवणा खुर्द
येथे दि.६ रोजी छञपती श्री.शिवाजी महाराज यांचा 351वा.राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला.
यावेळी जिजाऊमासाहेबांच्या प्रतिमे ची व राजे शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची मान्यवरांच्या हस्ते पुजा करण्यात आली.
या प्रसंगी ज्ञानेश्वर भांगे,इर्शाद शेख, गोविंद भांगे,शुभम करकीले,अमोल भांगे,कैलास वासरे,माधव भांगे, ओमकार भोसले,ओमकार मुळे, रामेश्वर वासरे,रिध्देश्र्वर करकीले व इतर शिवभक्त उपस्थित होते.

बोरगाव येथे शिवराज्याभिषेक दिन
हंडरगुळी | येथून जवळच असलेल्या मौजे. बोरगाव बू.येथे शिवराज्याभिषेक दिन उत्सहात साजरा करण्यात आला.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते भगव्या गुढीची व शिवाजी महाराजाच्या फोटोची पुजा करण्यात आली.


0 टिप्पण्या