चित्रा न्युज प्रतिनिधी
अकोला : जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय येथे आज वंचित बहुजन आघाडी पदाधिकाऱ्यांनी जिल्हा कृषी अधीक्षक यांना भेटून जिल्ह्यात व्यापाऱ्यांकडून सुरू असलेली त्वरित थांबवावी ही मागणी केली. अकोला जिल्ह्यामध्ये शेती पेरणी सुरू झाली असून अकोला जिल्ह्यामध्ये अजित 5 आणि अजित 55 बियाणे DAP आणि युरिया या खताचा प्रचंड तुटवडा असून काही व्यापाऱ्यांनी जाणीवपूर्वक तुटवडा निर्माण केला आहे. काही व्यापारी बियाणे व खते चोरून जास्त दराने विक्री करत असल्याचे अकोला जिल्ह्यामध्ये सुरू असून पेरणी जवळ आल्यामुळे गरीब शेतकऱ्यांना बी बियाणे व खते भेटत नसल्याने प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. याविरोधात जिल्हा कृषी अधीक्षक यांना जाब विचारण्यात आला आहे, तसेच ज्या कृषी सेवा केंद्र व्यापारी प्रतिष्ठानमध्ये अजित 5 व 155 डीएपी व युरिया रासायनिक खते उपलब्ध आहेत, त्या कृषी सेवा केंद्र व्यापारी प्रतिष्ठानची माहिती प्रसार माध्यमासमोर व शेतकऱ्यांसमोर तीन दिवसात द्यावी अन्यथा वंचित बहुजन आघाडी संपूर्ण जिल्हाभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी जिल्हा समन्वयक नतिकुद्दीन खतीब जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, आम्रपालीताई खंडारे, धीरज इंगळे, मजहर खान, गजानन गवई, डॉ धर्माळ, पवन बुटे, किशोर जामणीक, लक्ष्मीताई वानखडे, अनुराधाताई डांगे, अर्चनाताई डाबेराव, आकाश शिरसाट, अशोक शिरसाट, सुरेश शिरसाट, प्रदीप शिरसाट, सुनील इंगळे, विकास सदाशिव, देवानंद तायडे, डॉ राजुस्कर, प्रदीप पळसपगार, सतीश चोपडे, नितीन सपकाळ, अमोल जामणीक, नरेश बांगर, दीपक सावंत, अक्षय डोंगरे, तुषार राठोड, प्रशांत वानखडे, प्रतीक वानखडे, साईल गवई, बोदळेभाऊ, डॉक्टर वासिफ वसिम भाई, तुषार शिरसाट, प्रथमेश गोपनारायण, अंकित इंगळे, प्रेमराज भटकर इत्यादी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या